ETV Bharat / sitara

Bday Spl: अक्षय कुमारचा 'खिलाडी' ते 'हिट मशीन' पर्यंतचा 'फिल्मी' प्रवास...! - टॉयलेटः एक प्रेम

रुपेरी पडद्यावर धमाकेदार अॅक्शनसोबतच अक्षयनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं देखील आहे. त्यामुळेच आजच्या तरुणाईवरही त्याची वेगळीच छाप पाहायला मिळते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी....

Bday Spl: अक्षय कुमारचा 'खिलाडी' ते 'हिट मशीन' पर्यंतचा 'फिल्मी' प्रवास...!
author img

By

Published : Sep 9, 2019, 9:54 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये तब्बल २९ वर्षे पूर्ण केली आहेत. या २९ वर्षांमध्ये त्याने बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख निर्माण करत चाहत्यांच्या हृद्यावर राज्य केलंय. रुपेरी पडद्यावर धमाकेदार अॅक्शनसोबतच अक्षयनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं देखील आहे. त्यामुळेच आजच्या तरुणाईवरही त्याची वेगळीच छाप पाहायला मिळते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी....

९ सप्टेंबरला राजीव हरी ओम भाटिया म्हणजेच अक्षय कुमार आज ५२ वर्षाचा झालाय. अक्षयनं चित्रपटसृष्टीत आपले २९ वर्षाचे करिअर पूर्ण केलंय..

बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देणाऱ्याच्या यादीत अक्षयनं अग्रस्थान पटकावलंय. त्यामुळेच चाहत्यांवर त्याची वेगळीच छाप पाहायला मिळते. आत्तापर्यंत त्याने १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यायेत.. त्याचा दमदार अभिनय आणि कॉमिक टाईमिंगने प्रेक्षकांना आजवर खळखळून हसवलंय... त्यामुळेच तो राष्ट्रिय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराचाही मानकरी ठरलाय.

हेही वाचा-फरहान-प्रियांकाची रोमँट्रीक केमिस्ट्री; पाहा, द स्काय इज पिंकमधील फोटो

बॉलिवूडची हिट मशीन या नावनेही अक्षयला ओळख निर्माण केलीये. त्याने १९८७ सराली 'आज' या चित्रपटातून छोट्या भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अक्षयला पहिला मोठा ब्रेक १९९२च्या 'खिलाडी' चित्रपटात मिळाला. या चित्रपटानंतर मात्र त्यानं कधीही मागं वळून पाहिलं नाही.
या ब्रेकनंतर १९९४ साली त्याला 'दिल्लगी' चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं.

९० च्या दशकार 'इंसाफ', 'दावा', 'जुल्मी' यांशिवाय खिलाडी कुमारने बॉलिवूडमध्ये आपला वेगळा हातखंडा वापरला. यामध्ये काही चित्रपट अपयशीही ठरले. मात्र, अक्षयची एक वेगळी ओळख चाहत्यांमध्ये निर्माण झाली.

२००६ साली 'गरम मसाला' मधील भूमिकेसाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
पडद्यावर अभिनेत्रींसोबत रोमान्स असो, किवां विलनची भूमिका असो, अक्षयने प्रत्येक भूमिका दमदार साकारलीये.

हेही वाचा-चित्रपट साईन केल्याच्या वृत्तावर शाहरुखनं सोडलं मौन, शेअर केली पोस्ट

अक्षयला २००९ मध्ये पद्मश्री आणि २०११ मध्ये आशियन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. २०१६ साली रुस्तम चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रिय पुरस्कारही मिळाला. यानंतर त्याने 'टॉयलेटः एक प्रेम कथा', 'पॅडमॅन', आणि 'केसरी' यांसारख्या चित्रपटातूनही प्रेक्षकांची मने जिंकली.
अक्षय एक वर्साटाईल अभिनेता आहे, यात काहीही शंका नाही.

ईटीव्ही भारतकडून अक्षयला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.