ETV Bharat / sitara

'द फॅमिली मॅन २' चे प्रसारण थांबवा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार - वायको - वायको यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेले पत्र

'द फॅमिली मॅन सिझन २' या वेब सिरीजचे प्रसारण थांबवण्यात यावे असी मागणी एआयएडीएमकेचे राज्य सभा खासदार वायको यांनी केली आहे. तमिळ इलमच्या योध्यांनी केलेले बलिदान चुकीच्या पध्दतीने दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला असून यामुळे तमिळ जनतेच्या भावना दुखावल्याचे त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून कळवले आहे.

The Family Man 2
'द फॅमिली मॅन २'
author img

By

Published : May 24, 2021, 8:13 PM IST

'द फॅमिली मॅन सिझन २' या वेब सिरीजचे प्रसारण ४ जूनपासून अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. मात्र या मालिकेत तमिळ इलम या संघटनेच्या योध्यांना दहशतवादी दाखवल्याचे आणि सामंथा साकारत असलेल्या व्यक्तीरेखाही दहशतवादी दाखवत तिचे संबंध पाकिस्तानी अतेरेक्यांशी असल्याचे दाखवल्यामुळे तमिळ जनतेच्या भावना दुखावल्याचे राज्य सभा खासदार वायको यांनी म्हटले आहे. ही मालिका प्रसारित होऊन देऊ नये अन्यथा तामिळनाडूतील जनता गंभीर पाऊल उचलेल आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा वायको यांनी दिलाय.

Letter written by Vaiko to Prakash Javadekar
वायको यांनी प्रकाश जावडेकर यांना लिहिलेले पत्र

एआयएडीएमकेचे राज्य सभा खासदार वायको यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून 'द फॅमिली मॅन सिझन २' ही वेब मालिकेचे प्रसारण थांबवावे अथवा तीव्र आंदोलन करुन असा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलंय, ''तमिळ इलमच्या योध्यांनी केलेले बलिदान चुकीच्या पध्दतीने दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालाय. तमिळ बोलणारी अभिनेत्री सामंथा हिला दहशतवादी म्हणून दाखवण्यात आले असून तिचे पाकिस्तानी अतेरेक्यांशी संबंध दाखवण्यात आले आहेत. ही गोष्ट तमिळ लोकांची भावना दुखावणारे आहे आणि तमिळ संस्कती व समुदायाला बदनाम करणारे आहे. तामिळनाडूतील जनतेला हे पसंत पडलेले नाही व त्यांनी याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.''

त्यांनी पत्रात पुढे लिहिलंय, ''त्यामुळे द फॅमिली मॅन सिझन २ चे अमेझॉन प्राईम ओटीटीवरील प्रसारण थांबवण्यात यावे. नाहीतर तामिळनाडूतील जनता गंभीर पाऊल उचलेल आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.''असा आशय वायको यांच्या पत्रात आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

दरम्यान काही दिवसापूर्वी नाम तमिलार कट्ची (एनटीके)चे संस्थापक सीमन यांनी अमेझॉन प्राइम वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' बंद घालण्याची मागणी केली आहे. यामध्ये तमिळ लोक हे लबाड असतात आणि लिबरेशन टायगर्स फॉर तमिळ इलम (एलटीटीई) दहशतवादी असल्याचे चित्रण मालिकेत करण्यात आले आहे. सीमन यांनी येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की द फॅमिली मॅन 2 या वेब मालिकेचा ट्रेलर धक्कादायक आहे.

"मालिका एलटीटीईला जाणीवपूर्वक दहशतवादी आणि तमिळ लोकांना लबाड म्हणून दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी चेन्नई लोकेशन म्हणून निवडण्यात आले हा काही योगायोग नाही," असे सीमन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.