ETV Bharat / sitara

नीरज पांडे यांच्या ‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये आफताब शिवदासानीची लागली वर्णी! - ‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये आफताब शिवदासानी

नीरज पांडे आणि फ्रायडे स्टोरीटेलर्स यांनी ‘स्पेशल ऑप्स १.५’ साठी अभिनेता आफताब शिवदासानीची निवड केली आहे, जी ‘हिंमत स्टोरी’ म्हणून ओळखली जाणार आहे. या मालिकेतून देशावरील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांचे वास्तविक दर्शन भारतातील प्रेक्षकांना झाले आहे व पुढेही होत राहील.

‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये आफताब शिवदासानी
author img

By

Published : Feb 16, 2021, 4:51 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्पेशल ऑप्स’ या थ्रिलर वेब मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. प्रेक्षकांनी दिलेला जबरदस्त प्रतिसाद आणि हिंमतसिंग या व्यक्तिरेखेबद्दलचे कुतुहूल पाहून निर्मात्यांनी ‘१.५’ च्या प्रवासाची सुरुवात केली. नीरज पांडे आणि त्याच्या टीमने अनोखी स्पेशल सिरीज ‘स्पेशल ऑप्स १.५’ ची तयारी सुरु केली असली तरी हा ‘स्पेशल ऑप्स’ चा प्रिक्वेल किंवा सिक्वेल नाहीये. या सिरीजमधून प्रेक्षकांना सिरीजमधील नायक हिंमतसिंग याची ‘बॅक-स्टोरी’ पाहायला मिळणार आहे. हा दुसरा भाग हिम्मतसिंगला, अजून एक केस सोपविण्यात आल्यापासून सुरु होत असून संसदेवरील हल्ला हा मुख्य मुद्दा राहणार आहे.

Aftab Shivdasani in 'Special Ops 1.5'
‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये आफताब शिवदासानी
नीरज पांडे आणि फ्रायडे स्टोरीटेलर्स यांनी ‘स्पेशल ऑप्स १.५’ साठी अभिनेता आफताब शिवदासानीची निवड केली आहे, जी ‘हिंमत स्टोरी’ म्हणून ओळखली जाणार आहे. या मालिकेतून देशावरील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांचे वास्तविक दर्शन भारतातील प्रेक्षकांना झाले आहे व पुढेही होत राहील. स्पेशल ऑप्स युनिव्हर्सच्या सहाय्याने प्रथमच एक नवीन आणि अनोखी संकल्पना भारतात आणली गेली आणि या विश्वातील ‘स्पेशल ऑप्स १.५’ हे पुढील पाऊल आहे.
Aftab Shivdasani in 'Special Ops 1.5'
‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये आफताब शिवदासानी
आफताब शिवदासानीला ‘स्पेशल ऑप्स’ सिरीज खूप आवडली होती व त्याला वाटले नव्हते की त्याला या सिरीजसोबत जुळण्याचा मौका इतक्या लवकर मिळेल. तो उत्साहित होत म्हणाला, “‘फ्रायडे स्टोरीटेलर्स’च्या बॅनरखाली नीरज पांडेसारख्या चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शिकाबरोबर काम करण्याचे संधी मिळणे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. स्वप्नपूर्ती म्हणा हवं तर. मी ज्या सिरीज चा प्रचंड चाहता आहे त्यात मला अभिनय करायला मिळणे म्हणजे ‘आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन’ एव्हडे उल्हसित करणारे आहे.” नीरज पांडे म्हणाले, "’फ्रायडे स्टोरीटेलर्सला आफताब शिवदासानी सोबत आल्याचा खूप आनंद आहे. स्पेशल ऑप्स १.५ च्या कुटुंबात हा एक रोमांचक समावेश आहे आणि आम्ही त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत."स्पेशल ऑप्सचा पहिला हंगाम मार्च २०२० मध्ये सुरू झाला होता ज्यात के के मेनन व्यतिरिक्त सय्यमी खेर, शरद केळकर, करण टॅकर, मुझमिल इब्राहिम, सना खान, मेहर विज, दिव्या दत्ता, विनय पाठक आणि विपुल गुप्ता यांच्याही मुख्य भूमिका होत्या.‘स्पेशल ऑप्स १.५’ चे शूट नुकतेच सुरु झाले असून आफताब शिवदासानी आणि के के मेनन व्यतिरिक्त इतर कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - शाहरुख खानच्या ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.