ETV Bharat / sitara

सर्व नियमांचे पालन करुन सुरू झाले आफताब शिवदासानीच्या 'पॉयजन २'चे शूटिंग - आफताब शिवदासानी

आफताब शिवदासानीने आपल्या 'पॉयजन २' या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. शोच्या निर्मात्यांसह त्याने सोशल डिस्टन्सिंग करण्याच्या खबरदारीच्या उपायांसह काम कसे सुरू केले, हे सांगण्यासाठी त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.

Aftab Shivdasani
आफताब शिवदासानी
author img

By

Published : Jul 1, 2020, 1:56 PM IST

मुंबईः लॉकडाऊननंतर हळूहळू बऱ्याच गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. आता सिनेमा आणि टीव्ही मलिकांच्या शूटिंगलाही सुरूवात होत आहे. अभिनेता अफताब शिवदासानी याच्या ‘पॉयजन २’ या वेब सीरिजची तयारी पूर्ण झाली आहे. याच्या शुटिंगलाही सुरूवात झालीय आफताबने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ही माहिती चाहत्यांना कळवली आहे

इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये आफताबने सोशल डिस्टन्सिंगसह शूटिंगसाठी घालण्यात आलेल्या सर्व अटींचे पालन केले जात असल्याचे लिहिले आहे.

अ‍ॅक्शन-क्राइम थ्रिलर शो ‘पॉयजन २’ या वेब सीरिजच्या दुसर्‍या भागात आफताबने आदित्यसिंग राठोडची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा - आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'

मागील हंगाम गेल्या वर्षी रिलीज झाला होता, ज्यात अरबाज खान आणि तनुज विरवानी मुख्य भूमिकेत होते.

लॉकडाऊन शिथिल झाल्याने लोक समाधानी असून टीव्ही कलाकारांनीही सरकारच्या निर्देशानुसार शूटिंग सुरू केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.