ETV Bharat / sitara

शरद पवार यांची अभिनेत्री अलका कुबल यांनी घेतली भेट - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

अभिनेत्री अलका कुबल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये उपस्थित होते.

Actress Alka Kubal met Sharad Pawar
शरद पवार यांची अभिनेत्री अलका कुबल यांनी घेतली भेट
author img

By

Published : Aug 9, 2021, 3:28 PM IST

बारामती : सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवार यांच्या बारामतीतल्या "गोविंदबाग" या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर उपस्थित होते. ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

वर्षभरापूर्वी "काळूबाईच्या नावानं चांगभलं" या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.त्यावेळी शरद पवार यांनी सेट वरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते. नुकतीच कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा करण्यात आली.

अलका कुबल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रमुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी शहरात चित्रीकरण करण्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन स्थळे आणि गावागावांमध्ये असलेल्या लोकेशनचा देखील वापर करावा त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल, असे आवाहन केल्याचे कुबल यांनी सांगितले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये, जेष्ठ अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आ.मकरंद आबा पाटील,निखील घाडगे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.