शिर्डी - प्रसिध्द सिने अभिनेता जितेंद्रने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत साई चरणी प्रार्थना केली. मी साईभक्त आहे, गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीला येण्याची इच्छा होती. मात्र, साईंचा आदेश होत नव्हता. आज बाबांचे बोलवणं आल्याने शिर्डीला येऊन साई दर्शन घेतल्याने प्रसन्नता वाटली असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी त्या विषयावर बोलण्याचे टाळले. ते म्हणाले, ''अभिनेता म्हणून मी 22 वर्षांपासून रिटायर्ड झालोय. त्या नंतर पुन्हा या क्षेत्रात येणार नसल्याचे मी ठरवलंय. आता मी माझ्या दोन्ही मुलांच्या मागे उभे राहण्याचे काम करतोय. त्यांच्या मागे राहुन जे करायच ते मी करतोय,'' असं जितेंद्रने माध्यमांशी बोलताना सांगितले.