मुंबई - अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने जाहीर केले की अॅमेझॉन ओरिजनल मालिकेचा बहुप्रतिक्षित नवीन सीझन 'ब्रीथ' 10 जुलै 2020 रोजी प्रदर्शित होईल. या मालिकेमुळे दक्षिण भारतातील आघाडीची अभिनेत्री नित्या मेननही डिजिटल डेब्यू करत आहे.सयामी खेरही या कलाकारांच्या टोळीत सहभागी झाली आहे. यात अभिनेता अमित साध पुन्हा एकदा इन्स्पेक्टर कबीरच्या भूमिकेत झळकणार आहे. अॅमेझॉन प्राइम ओरिजनल मालिका असलेला हा शो जगभरातील २०० देशामध्ये झळकणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा शो लॉन्च होईल.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मधील इंडिया ओरिजनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित सांगतात, "अभिषेक बच्चन, अमित साध, नित्य मेनन आणि सयामी खेर यांच्यासह इतर कलाकारांसह 'ब्रीथ: द शॅडो' हा नवीन शो सादर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. आमचा विश्वास आहे की आमच्या जगभरातील प्रेक्षकांना संपूर्ण भारतासह या मालिकेची आवड निर्माण होईल."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अबुंदंतिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा म्हणाले, , "अबुदंतिया एंटरटेनमेंट विविध प्रकारांमध्ये आकर्षक आणि प्रभावी आशयसामुग्री तयार करण्यात नेहमीच अग्रणी आहे. आम्ही अॅमेझॉनची मूळ यशस्वी मालिका 'ब्रीथ' च्या नवीन हंगामासह पुन्हा एकदा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसह सहयोग करण्यास उत्सुक आहोत. अमित, अभिषेक नित्या आणि सयामी सोबत एकत्र आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की मयंकच्या एका मनोरंजक , एका ताज्या आणि वर्धित कथानकासह हा कार्यक्रम जगभरातील चाहत्यांना आवडेल. "
दिग्दर्शक मयंक शर्मा म्हणाले, "प्राइम मेंबर्ससाठी 'ब्रीथ'चा एक नवीन सीझन आणल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. शोमधील प्रत्येक पात्राची स्वतःची एक कथा असूनही प्रेक्षकांना याची जाणीव होईल की, ही कथा किती मनोरंजकपणे संपली आहे. या नव्या अध्यायातून मी प्राइम मेंबर्सला भावना व साहस यांच्या नव्या रोलर-कोस्टर प्रवासाला घेऊन जाण्यास उत्सुक आहे. "
अबुंदंतिया एंटरटेनमेंट या मालिकेची निर्मिती केली असून मयंक शर्मा दिग्दर्शक आहेत. याचे एपिसोड भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सय्यद आणि मयंक शर्मा यांनी उत्तमरित्या लिहिले आहे.