मुंबई - कोरोना व्हायरस या आजाराशी लढा यशस्वीपणे जिंकल्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा कामावर जाण्यासाठी आणि व्यावसायिक बांधिलकी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत.
विषाणूपासून बरे झाल्यानंतर पहिल्या मुलाखतीत, अभिनेत्याने पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. अभिषेकने सांगितले की, "मी कामावर परत जाण्याची योजना आखली आहे. मला बिग बुल आणि बॉब बिस्वास चित्रपट अजूनही पूर्ण करावयाचे आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर परवानगी मिळवून कामाला सुरूवात करीत आहोत."
जे लोक एकतर कोविडग्रस्त आहेत किंवा घाबरत आहेत अशा लोकांसाठी त्यांचा संदेश काय आहे, असे विचारले असता अभिनेता म्हणाला: "मी सांगण्यासाठी कोणीही मोठा नाही, मी वैद्यकीय सल्ला देण्यासही पात्र नाही. व्यक्तिशः मी एवढेच सांगू शकतो की, एक सकारात्मक मानसिकता ठेवा आणि शिस्तबद्ध रहा. "
अभिषेक आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांची 11 जुलैला कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांनाही या विषाणूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि काही दिवसांनतर सोडण्यात आले होते.
"यापूर्वी मी व वडील दोघांनीही कोविड १९ची चाचणी केली होती. कोरोना हल्ल्याची लक्षणे जाणवल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आम्ही सर्व आवश्यक अधिकार्यांना कळविले होते आणि आमचे कुटुंब आणि कर्मचारी सर्व तपासले होते. मी सर्वांना घाबरुन न जाता शांत राहण्याची विनंती करेन. धन्यवाद, "अभिषेकने यापूर्वी ट्विटरवर ही माहिती दिली होती.
बिग बीला 2 ऑगस्ट रोजी सोडण्यात आले होते, अभिषेकवर निगेटिव्ह चाचणी होईपर्यंत अजून एक आठवडा त्याच्यावर उपचार सुरू होता. त्यानंतर तो बरा होऊन सुखरुप घरी परतला होता.
जुलै महिन्यात अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या ब्रीथः इन टू द शॅडो या वेब सिरीजमध्ये अभिषेकने मध्यवर्ती भूमिका साकरली होती.
बिग बुल आणि लुडोसह त्याचे आगामी अनेक प्रकल्प ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.