मुंबई - टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने सोमवारी एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात तिचा नवरा अभिनव कोहली तिच्यावर अत्याचार आणि हिंसाचार करताना दिसला आहे. हे फुटेज सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अभिनवनेही आपली बाजू मांडत या दाव्याचे खंडन केले आहे.
श्वेताने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनव तिच्याबरोबर आणि मुलगा रेयांश सोबत फिरताना दिसत आहे. श्वेताने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ''आता सत्य बाहेर येऊ द्या !!!! (परंतु हे माझ्या खात्यावर कायमचे असणार नाही, मी अखेरीस ते हटवेल, सत्य उघड करण्यासाठी मी हे पोस्ट करत आहे) या कारणामुळेच माझा मुलगा त्याला घाबरतो. या घटनेनंतर माझा मुलगा १ महिना घाबरलेला होता. तो इतका घाबरला होता की रात्री तो झोपतही नव्हता.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, "त्याचा हात दोन दिवस दुखत होता. तो वडील घरी येण्याने किंवा त्याच्या भेटीने घाबरत असे. या मानसिक अवस्थेतून जाताना मला पाहावत नव्हते. मी त्याला शांत राखण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असते. परंतु या भयानक माणसाला असे होऊ नये असे वाटत असते. जर ही हिंसा नाही तर मग काय आहे. हे माझ्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज आहे."
विशेष म्हणजे श्वेताच्या आरोपाला उत्तर देताना अभिनवने एक तास सोळा मिनिटांचा एक लांब व्हिडिओही शेअर केला असून त्यामध्ये ते २४ ऑक्टोबर २०२०च्या घटनेविषयी बोलत आहे.
आपल्या बचावामध्ये अभिनव म्हणाला की त्याने श्वेताला नेहमीच आपल्या मुलास भेटण्याची परवानगी दिली होती, परंतु श्वेताची वृत्ती त्याच्यासाठी योग्य नव्हता, म्हणूनच त्याला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला. अभिनव याने श्वेताविरोधात द जुवेनाईल जस्टिस (मुलांची काळजी व संरक्षण) अंतर्गत समतानगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यासंदर्भात अर्जही लिहिला आहे.
श्वेताचे आधी राजा चौधरीशी लग्न झाले होते. घरगुती हिंसाचाराचा आरोप करत या अभिनेत्रीने राजाला घटस्फोट दिला आणि २०१३ मध्ये अभिनव कोहलीशी लग्न केले होते.
हेही वाचा - 'लालसिंग चड्ढा'साठी आमिर आणि नागा चैतन्य करणार लडाखमध्ये शूटिंग