ETV Bharat / sitara

‘आई मायेचं कवच’ मालिकेत लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार? - Marathi series Aai Mayache Kavach

‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण मिळणार आहे कारण सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार सापडणार आहे. लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार, सुहानीपर्यंत पोहोचण्याचा मीनाक्षीला मार्ग सापडणार का अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेतून मिळणार आहेत.

‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण
‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण
author img

By

Published : Feb 10, 2022, 3:25 PM IST

देव सर्वच घरात उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात ‘आई’ दिली. आई आणि आईचं प्रेम हे काही वेगळ्या शब्दांमध्ये मांडायला नको. सगळं जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे. आपल्या लेकारावर जर कोणी निस्वार्थपणे माया करत असेल तर ती आईचं. हल्लीची तरुणाई भावनाप्रधानतेला फारसं महत्व देत नाही. पाश्चिमात्य देशांची नक्कल करता करता त्याच्यातली माणुसकी तर हरवून जाणार नाही ना हा प्रश्न पालकांना सतावतोय. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला हे प्रेम कळत नाही किंवा कळून देखील आपण न कळल्याचा आव आणत असतो. कारण, आपल्याला आपलं स्वातंत्र्य त्यापुढे अधिक महत्वाचं वाटत असतं.

मूल चुकलं तर पुन्हा एकदा मार्गावर आणणारी ही आईच असते. ‘आई मायेचं कवच’ मालिकेत सुहानीसोबत असंच काहीसं घडताना दिसत आहे. जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरच जग प्रिय होतं. आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो आहे. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाहीये. बर्‍याचदा जवळचा माणूसच संशयित म्हणून समोर येतात त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसतं आहे.

‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण
‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण

हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'तील नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज

आता मात्र मालिकेला नवं वळण मिळणार आहे कारण सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार सापडणार आहे. बेपत्ता असलेल्या सुहानीच्या शोधात असताना तिला सुशांत विरोधात देखील पुरावा सापडणार आहे. आता पुरावा काय असेल, चांदेकर यामागे असून सुहानी त्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. या कटामध्ये नक्की चांदेकरचा हात आहे या सत्यापर्यंत ती कशी पोहचणार व कसा असेल मीनाक्षीचा पुढचा प्रवास हे बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असेल. आता मीनाक्षी त्याच्यापर्यंत कशी पोहचेल, चांदेकर या सगळ्यामागे हे मीनाक्षीला कधी समजेल, लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार, सुहानीपर्यंत पोहोचण्याचा मीनाक्षीला मार्ग सापडणार का अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेतून मिळणार आहेत.

‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण
‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवं वळण

‘आई मायेचं कवच’ ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होते.

हेही वाचा - अभिनेता किरण गायकवाड : “देवमाणूस नाम सूनके भगवान समजे क्या? भगवान नाही दानव है में"!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.