मुंबई - ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे हॉरर जॉनर सुद्धा टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना आवडतो हे या मालिकेने सिद्ध केले. त्यामुळेच दोन भागानंतर प्रेक्षक ‘रात्रीस खेळ चाले’ च्या तिसऱ्या भागालाही भरपूर प्रेम देताहेत. ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील विलक्षण वळणं प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवतात.
आतापर्यंत प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी ते दोघे शर्थीचे प्रयत्न करत आहे. सयाजी आणि कावेरी यांना वश करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न असफल होत आहेत. त्यामुळे अण्णा आणि शेवंताचं लग्न जोपर्यंत होत नाही तो पर्यंत या वाड्यात कुठलंच मंगलकार्य होऊ द्यायचं नाही असं अण्णा आणि शेवंता मनाशी पक्क करतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्याचसुमारास अभिराम पूर्वाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. पण त्यातही काही तरी विघ्न येणार अशी चाहूल वच्छीला लागते. काहीही झालं तरी हे लग्न निर्विघ्न पार पाडायचंच असं अभिराम ठरवतो. पूर्वाची लग्नघटिका समीप आली आहे. माई नेहमीच आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी झटत आल्या आहेत. त्यांची पुण्याई यावेळी कामी येणार कि अण्णा आणि शेवंताची सूड भावना नाईकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
हेही वाचा - Vasantrao Deshpande Biopic : ‘मी वसंतराव’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर!