ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तानाशाही आणि लढाई! - मराठी बिग बॉसच्या घरात भांडण

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु होता. टीम A आणि टीम B मध्ये शाब्दिक युध्द चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी
author img

By

Published : Oct 1, 2021, 1:40 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु होता. टीम A आणि टीम B मध्ये शाब्दिक युध्द चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत. विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचे पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसले. टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी पडली. अक्षयच्या आंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये बाचाबाची झाली, ज्यामध्ये अक्षय विशालला बोलला, “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत”.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी

दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकंफुलकं करण्याचं काम सुरुवातीपासून करत आले आहेत. ते कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी आणतात. आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली आणि त्यात पाणीच ठेवायला विसरला. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली, “आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट” त्यावर मग तृप्ती देसाई देखील म्हणाल्या, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”. दादुस लगेच म्हणाले, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक”. त्यावर मग सोनालीने देखील केलं एक वाक्य. म्हणाली “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक”. तृप्ती ताईंना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवलं असणार त्या म्हणाल्या “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक”? आणि असे अनेक यमक सदस्य जुळवताना दिसले.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी

विकास आणि विशाल अशीच कोणत्या तरी मुद्द्यावर चर्चा करत असताना अचानक विकास पाटील म्हणाला “आता जरी रावणाचं राज्य असलं तरी एक ना एक दिवस राम राज्य येईल बिग बॉस काळजी करू नका. सत्याच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार.” तर मीनलचं देखील तसंचं म्हणण पडलं की, “मला आंदोलन करायचं आहे. जी तानाशाही सुरु आहे त्याच्याविरोधात”. विकास पुढे म्हणाला, “बघना सकाळपासून फक्त आपणचं काम करतो आहे आणि ते काय करत आहेत गेम खेळत आहेत. अख्खा महाराष्ट्र बघतो आहे बिग बॉस... “.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - कीर्तनकार शिवलीला पाटील ‘या’ कारणासाठी गेल्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.