ETV Bharat / sitara

५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित - aamhi doghi

चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस आणि ७ तांत्रिक पुरस्कार तसेच १ बालकलाकार अशी ८ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत

५६ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार
author img

By

Published : Apr 13, 2019, 11:33 AM IST

मुंबई - ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस आणि ७ तांत्रिक पुरस्कार तसेच १ बालकलाकार अशी ८ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.

तर घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ)आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या १४ तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले. घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारांसाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार २६ मे २०१९ ला चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येतील.

Intro: ( बतमीसोबत पाठवलेले फोटो हे राज्य चित्रपट पुरस्काराच्या परीक्षकांचे आहेत विजेत्यांचे नाहीत.)

56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.
             अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या,भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. तर घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या),उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ)आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.
दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 66 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या 14 तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.
घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार 26 मे 2019 रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.