ETV Bharat / sitara

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात १४ लिटिल चॅम्प्सना साथ देणार ४ छोटे वादक!

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवीन पर्व तब्बल १२ वर्षांनी येऊ घातले आहे. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करायची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही तर वादक मित्रांमध्ये देखील लिटिल चॅम्प्स दिसतील.लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात ४ छोटे वादक मित्र साथ देताना दिसतील.

author img

By

Published : Jun 24, 2021, 3:06 PM IST

new season of Saregampa
सारेगमप लिटिल चॅम्प्स

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवीन पर्व तब्बल १२ वर्षांनी येऊ घातले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एलिमिनेशन होणार नाही आहे. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करायची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही तर वादक मित्रांमध्ये देखील लिटिल चॅम्प्स दिसतील. या कार्यक्रमामध्ये काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस येतील. हो, हे खरं आहे. लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात ४ छोटे वादक मित्र साथ देताना दिसतील.

new season of Saregampa
सारेगमप लिटिल चॅम्प्स

छोट्या वादक मित्रांत औरंगाबादचा सोहम उगले हा प्रेक्षकांना कार्यक्रमात संबळ वाजवताना दिसेल, तो वयाच्या चौथ्या वर्षांपासून संबळ शिकतोय. कोल्हापूरची तन्वी धनंजय पाटील ही वयाच्या ८ वर्षांपासून वारणा बालवाद्य वृंदमध्ये भाग घेत आहे. तिला मेंडोलिन, जलतरंग हार्मोनियम, कीबोर्ड आणि व्हायोलिन एवढी सगळी वाद्य वाजवता येतात त्याच बरोबर ती खूप छान गाते सुद्धा. ती लिटिल चॅम्प्सच्या गाण्यांमध्ये मेंडोलिन वाजवून साथ देईल.

तसंच कोल्हापूरचाच सोहम सचिन जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना दिसेल. सोहम वयाच्या बाराव्या वर्षांपासून संतूर तर तिसऱ्या वर्षांपासून बासरी शिकत आहे. नाशिकचा ११ वर्षांच्या जय अविनाश गांगुर्डेचा समावेश आहे जो कोंगो तुंबा वाजवताना दिसेल. जय वयाच्या दोन वर्षापासून हे वाद्य वाजवतोय तसंच त्याला ‘अटल गौरव अलंकार मध्य प्रदेश सरकार पुरस्कार’ मिळाला आहे.

new season of Saregampa
सारेगमप लिटिल चॅम्प्स

प्रेक्षकांनी क्वचित पाहिलेली वाद्य देखील ही मुलं अगदी सहज वाजवतात. 'छोट्यांचे मोठ्ठ स्वप्न साकारणार' असं म्हणत खऱ्या अर्थाने सारेगमपचा मंच हा या मुलांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देतोय. त्यामुळे या छोट्या दोस्तांच्या टॅलेंटला प्रेक्षक नक्कीच दाद देतील अशी आशा ‘पंचरत्नांना’ आहे.

“सारेगमप लिटिल चॅम्प्स” २४ जून पासून गुरुवार ते शनिवार रात्री झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - ‘रॉकेट बॉईज'मधून उलगडणार होमी जे भाभा आणि विक्रम ए साराभाई यांचा जीवनपट!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.