कोची - दाक्षिणात्य अभिनेत्री शमना कासिम हिला धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींना केरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस तक्रारीनंतर तातडीने चार जणांना ताब्यात घेतल्याचे मरदु पोलीस स्टेशमधील अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ओळख न देण्याच्या अटीवर अधिकारी म्हणाले, ''चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.''
हेही वाचा - पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सुशांतसाठी लिहिली भावूक पोस्ट
शमना कासिम हिने एक डान्सर आणि मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. टीव्ही उद्योगात यशस्वी झाल्यानंतर तिने आता सिने क्षेत्रात पाऊल टाकले आहे. २००४ पासून आतापर्यंत तिने सुमारे ४० दाक्षिणात्य सिनेमातून काम केले आहे.