मुंबई - ‘तब्बर’ म्हणजे स्वजीवन. या नावाची वेब सिरीज नुकतीच रुजू झालीय, सोनीलिव्ह वर. सोनीलिव्हची नवीन ओरिजिनल दृढ नाते असलेल्या कुटुंबामधील प्रेम व त्यागाच्या अवतीभोवती फिरते. स्वतःच्या जीवनाचा, म्हणजेच तब्बरचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सर्व जीवनरेखा धुसर होतात. यापूर्वी कधीच न दिसण्यात आलेले गुन्हेगारी व कौटुंबिक ड्रामाचे सुरेख संयोजन सादर करणारी, रोमांचक कथानक सांगणारी आणि पवन मल्होत्रा, सुप्रिया पाठक, गगन अरोरा, परमवीर सिंग चीमा, कंवलजीत सिंग आणि रणवीर शोरे असे प्रतिभावान कलाकार असलेली ही सिरीज प्रेक्षकांना वेगळा अनुभव देऊन जाईल.
जेएआर पिक्चर्सचे अजय जी. राय निर्मित सिरीज 'तब्बर' सिंग कुटुंबाचा प्रवास आणि एका दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या जीवनाला कशाप्रकारे कलाटणी मिळते आणि अशा संघर्षमय वातावरणामध्ये देखील टिकून राहण्याचा प्रयत्न कणाऱ्या कुटुंबाचे धैर्य व चिकाटी दर्शविते. राष्ट्रीय पुरस्कार-प्राप्त चित्रपटनिर्माते अजितपाल सिंग यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिरीजचे लेखन हर्मन वडाला व संदीप जैन यांनी केले आहे. बाबा फरिद यांच्या 'तुरीया तुरीया' गाण्यामधून सिरीजमधील भावना सुरेखरित्या सादर होतात. हे गाणे प्रख्यात गायक दलेर मेहंदी व रेखा भारद्वाज यांनी गायले आहे. संगीत दिग्दर्शक स्नेहा खानवलकर यांनी संगीतबद्ध केलेल्या मधुरमय गाण्याच्या गीतामधून पात्रांच्या असंख्य भावना सादर होतात आणि हे गाणे लक्षवेधक पटकथेला साजेसे आहे.
दिग्दर्शक अजितपाल सिंग म्हणाले, “ओटीटी निश्चितच क्रिएटर्सना विभिन्न शैली व कथानक स्टाइल्ससह प्रयोग करण्यासाठी व्यासपीठ देत आहे, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या स्क्रीन्ससमोर खिळून राहतील. मला सोनीलिव्हवर सुरू होणाऱ्या 'तब्बर'सह माझा डिजिटल प्रवास सुरू करण्याचा आनंद होत आहे. या सिरीजमध्ये अनेक भावना आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांनी साकारलेली खास पात्रे आहेत.
आशिष गोलवलकर, कन्टेन्ट प्रमुख, सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन, सोनीलिव्ह, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया, म्हणाले की, “'तब्बर' या सिरीजच्या माध्यमातून सुप्रिया पाठक, पवन मल्होत्रा, निर्माता अजय जी. राय, दिग्दर्शक अजितपाल सिंग आणि गायक रेखा भारद्वाज व दलेर मेहंदी एकाच छताखाली पुनरागमन करत आहेत. जेएआर पिक्चर्ससोबत सहयोगाने आमची तिसरी सिरीज आहे आणि सिरीजचे कथानक अभूतपूर्व असण्यासोबत त्यामध्ये प्रतिभांचे उत्तम मिश्रण आहे. आम्हाला विश्वास आहे की 'तब्बर' भारतीयांच्या मनातील विविध कथांना समोर आणण्याच्या आमच्या कटिबद्धतेला प्रतिसाद देईल.
अभिनेत्री सुप्रिया पाठक म्हणाली, “सरगुन ही एक मध्यमवर्गीय महिला आहे, जिचे जीवन तिच्या कुटुंबाचे संगोपन व काळजी घेण्यासह सुरू होते आणि तेथेच संपते. 'तब्बर'मध्ये सरगुनचे तिचा पती व मुलांसोबत असलेल्या नात्याला सुरेखरित्या रचण्यात आले आहे. खरेतर, भूमिकेची सर्वसमावेशक स्थितींप्रती व्यथा व प्रतिक्रियांनी मला आईच्या विविध पैलूंना सादर करण्यास प्रवृत्त केले आहे. अजितपाल सिंग, सह-कलाकार, लेखक यांच्यासोबत काम करताना खूप चांगले वाटले.” अभिनेता पवन मल्होत्रा म्हणाला की, “वडिल आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, ज्यामध्ये संरक्षण व संघर्षाची बाब दिसून येते आणि ही सिरीज या बाबीला सुरेखरित्या सादर करते. प्रेक्षकांना 'तब्बर'मध्ये संबंधित, पण अनपेक्षित ओमकारची भूमिका पाहायला मिळेल.
अभिनेता रणवीर शोरे म्हणाला की, “'तब्बर'शी उत्तरेकडील कोणीही संलग्न होईल. सिरीजचे शीर्षक अगदी कथानकाला साजेसे आहे. माझी भूमिका अत्यंत रोचक आहे. तसेच पवन मल्होत्रा, सुप्रिया पाठक यांसारखे सह-कलाकार असतील तर कथानक अधिक प्रबळ होऊन जाते. याव्यतिरिक्त अजितपाल सिंग यांच्या स्थानिक कथानकामध्ये रोमांचची भर करण्याच्या कलेने सिरीज ला उंचीवर नेऊन ठेवले आहे.
निर्माता अजय जी. राय, जेएसआर पिक्चर्स म्हणाले की, “हे प्रबळ कथानक असण्यासोबत त्याला अद्भुत कलाकारांचा पाठिंबा मिळाला आहे. हर्मन वडाला व संदीप जैन यांनी या पटकथेचे सुरेखरित्या लेखन केले आहे. अजितपाल सिंग यांचे दिग्दर्शन असलेल्या सिंग कुटुंबाच्या या लक्षवेधक कथेशी प्रत्येक कुटुंब संलग्न होतील. मला खात्री आहे की, पात्रांसंदर्भातील जटिलता प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
रोमांचक कथानक आणि पवन मल्होत्रा, सुप्रिया पाठक, गगन अरोरा, परमवीर सिंग चीमा, कंवलजीत सिंग आणि रणवीर शोरे असे प्रतिभावान कलाकार असलेली ‘तब्बर’ ही सिरीज सोनीलिव्ह वर १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध आहे.
हेही वाचा - बालकाला जीवदान देण्यासाठी फराह खानने उभी केली 16 कोटींची मदत