ETV Bharat / sitara

'द लायन किंग'- जाणून घ्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया - आर्यन खान

'द लायन किंग' हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या याच नावाच्या सिनेमावर आधारित आहे. सिनेमात मुसाफा आणि त्याच्या मुलाची गोष्ट आहे.

'द लायन किंग' हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या याच नावाच्या सिनेमावर आधारित आहे
author img

By

Published : Jul 21, 2019, 11:55 AM IST

नवी दिल्ली - सध्या बॉक्स ऑफिसवर डिजनीची निर्मिती असलेला 'द लायन किंग' हा सिनेमा धूमाकुळ घालतोय. उत्तम अॅनिमेशन आणि ग्राफिक्समुळे चाहत्यांची वाहवा मिळवण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे. लहान मुलांच्या वाढत्या प्रतिसादाने सिनेमाचं अॅडव्हांस बुकींग सुरू झालंय. यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भर पडली आहे.

शाहरूख खानचा आवाज

सिनेमातील सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे, बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याने चित्रपटातील 'मुसाफा' या पात्रासाठी आवाज दिला आहे. किंग खान सोबतच त्याचा मुलगा आर्यन खान याने 'सिंबा' या पात्रासाठी डबींग केले आहे.

सिनेमाची गोष्ट

सिनेमाची पटकथा अफ्रिकेतील एका जंगलाचा राजा- मुसाफा याच्या पुत्राच्या राजगादी वारसासंबंधी आहे. मुसाफाला स्वत: च्या मुलाला राजा बनवण्याची इच्छा असते; परंतु, मुसाफाच्या भावाला राजगादीची ओढ असते. राजा होण्यासाठी त्याने केलेल्या षडयंत्रावर या सिनेमाची पटकथा आधारित आहे. हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झालेल्या याच चित्रपटाचा रिमेक आहे. पहिल्यांदाच आर्यन आणि शाहरूख खान हे पिता-पुत्र एकत्र सिनेमासाठी आवाज देत असल्याने चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल आकर्षण आहे.

चाहत्यांकडून सिनेमाला 'चार स्टार'

लहान मुलांसोबतच मोठ्यांनीही सिनेमाला हजेरी लावली आहे. यामुळे प्रौढांमध्येही सिनेमाची चर्चा आहे. चित्रपटातील जंगलाचे वर्णन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अद्भूत आणि रोमांचकारी दृश्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहेत.

Intro:Body:

omkar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.