ETV Bharat / sitara

FILM REVIEW: समलैंगिक नात्यावर भाष्य करणारा 'एक लडकी को देखा तो...' - anil kapoor

एक लडकी को देखा तो ऐसा लगा
author img

By

Published : Mar 10, 2019, 2:02 PM IST

Updated : Mar 10, 2019, 2:53 PM IST

मुंबई - १९९४ साली आलेल्या '१९४२ अ लव्हस्टोरी' या चित्रपटातील एक लडकी को देखा तो ऐसा लगा गाण्यानं प्रेक्षकांवर भूरळ पाडली. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मनीषा कोइराला आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या याच गाण्याच्या ओळींवर आपल्या चित्रपटाचे शीर्षक देत शैली चोप्राने एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट आज प्रदर्शित झाला.

चित्रपटात एका पंजाबी कुटुंबाची कथा दाखवली आहे. ज्यात सोनम स्वीटी नावाच्या पंजाबी मुलीचे पात्र साकारते. चित्रपटाचे नाव आणि ट्रेलर पाहता या चित्रपटात राजकुमार राव आणि सोनम कपूर यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार, अशी प्रेक्षकांची समजूत होती. मात्र, चित्रपटात या उलट आहे. सिनेमा जसजसा पुढे जातो तसे अनेक धक्कादायक खुलासे होतात. जे चित्रपटाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. कारण, 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' ही ओळ राजकुमारच्या नव्हे तर सोनमच्या भावनांशी जुळणारी असते.

लहानपणापासूनच ती लग्नाचे स्वप्न पाहत असते. त्यामुळे, तारुण्यात आल्यावर तिचे वडिल अनिल कपूर म्हणजेच बलबीर चौधरी तिचा विवाह साहिल मिर्झा (राजकुमार राव) नावाच्या एका लेखक-दिग्दर्शकासोबत जमवतात. मात्र, यामुळे स्वीटी म्हणजेच सोनमला धक्का बसतो. कारण, तिचं प्रेम कोणा मुलावर नसून एका मुलीवर असते. ही गोष्ट स्वीटीच्या भावाला समजते. यानंतर चित्रपटात एक वेगळाच ट्विस्ट येतो. समलैंगिक किंवा लेस्बियन लव्हस्टोरीसारखा बोल्ड विषय या चित्रपटातून हाताळण्यात आला आहे. विशेष म्हणजे शैली चोप्राने या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं असून तिने हाताळलेल्या या विषयाचं आणि चित्रपटाचं विशेष कौतुक होत आहे. एक क्षण खळखळून हसवणारा आणि दुसऱ्याच क्षणी प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा हा चित्रपट एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. विशेषतः यातील सोनम कपूरचा अभिनय प्रेक्षकांची मने जिंकतो. बॉलिवूडमधील प्रेमाची व्याख्या बदलणारा हा चित्रपट नव्याने विचार करायला भाग पाडणारा आहे.

Intro:Body:

पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांसारखे दिसतात; काँग्रेसच्या विजया यांची टीका

हैदराबाद - काँग्रेसच्या स्टार प्रचारक विजया शांती यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जाहीर सभेत विजया यांनी मोदींची तुलना दहशतवाद्यांशी केली. मोदी कधी बॉम्ब फेकतील यामुळे लोक घाबरतात, असेही त्या म्हणाल्या.

राहुल गांधी सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विजया बोलत होत्या. जनतेवर प्रेम करायला हवे. मात्र, मोदी त्यांना घाबरवतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे वागू नये, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, राहुल गांधींनीही यावेळी बोलताना केंद्र सरकारसह मोदींवर टीका केली. गेल्या ५ वर्षांत पंतप्रधान मोदींनी २ प्रकारचा भारत बनवलाय. एक श्रीमंतांचा भारत, ज्यात अनिल अंबानींसारखे लोक आहेत. जे स्वत:च्या खासगी विमानाने प्रवास करून वाटेल ते करू शकतात. तसेच दुसऱ्या भारतात शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी करत आहेत, असेही राहुल म्हणाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मोदींच्या निर्देशानुसार वागतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Conclusion:
Last Updated : Mar 10, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.