ETV Bharat / sitara

हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या अच्युत पोतदार यांना झी मराठीने प्रदान केला जीवनगौरव पुरस्कार! - झी मराठी जीवनगौरव पुरस्कार २०२१

अभिनेता आमीर खानला मशीनची पुस्तकी व्याख्या विचारणारा प्राध्यापक म्हणजेच अच्युत पोतदार आपल्याला आठवत असेल. “कहना क्या चाहते हो” हे ‘थ्री इडियट्स’ मधील वाक्य आजही तरुणाईच्या तोंडी आहे आणि त्याचे शेकडो मिम्सही लोकप्रिय आहेत. अच्युत पोतदार हे अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, भारतीय सैन्य दलात दाखल होऊन भारत-पाकिस्तान युध्दात भागही घेतला होता. अशा या हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या अच्युत पोतदार यांना झी मराठीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

Achyut Potdar
अच्युत पोतदार
author img

By

Published : Mar 29, 2021, 7:59 PM IST

मुंबई - अभिनेता आमीर खानला मशीनची पुस्तकी व्याख्या विचारणारा प्राध्यापक आणि त्याचं ते... “कहना क्या चाहते हो” हे ‘थ्री इडियट्स’ मधील वाक्य सहज प्रेक्षकांच्या ओठी येतं. अच्युत पोतदार यांच्या त्या प्रश्नाचे अनेक मिम्स व्हायरल झालेत. “हम यहा आपकी सेवा करने के लिए ही तो बैठे है,” असं म्हणत श्रीनिवास वागळे यांचं लायसन्स देणारा ‘वागळे की दुनिया’ मालिकेतला ऑफिसर अच्युत पोतदार अनेकांना आठवत असतील. त्यांनी हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये आपल्या तगड्या अभिनयाने नावलौकिक मिळविला आहे. अच्युत पोतदार हे अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, भारतीय सैन्य दलात दाखल होऊन भारत-पाकिस्तान युध्दात आपल्यावर सोपवलेली कामगिरी फत्ते करणारे कर्तव्यदक्ष कॅप्टन, त्यानंतर इंडियन ऑईलमध्ये अधिकारी पद या भूमिका चोख पार पाडून अभिनय क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहण्यासाठी त्यांनी अनेक भूमिका केल्या आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळविला.

Achyut Potdar
अच्युत पोतदार
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२०-२१’ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले अच्युत पोतदार. त्यांनी निवडलेली अभिनयक्षेत्राची वाट अतिशय खडतर होती. परंतु अच्युत पोतदार यांचं व्यक्तिमत्त्वच मुळात हसतमुख, शिस्तप्रिय, धीट आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असल्यामुळे ती खडतर वाटही फुलांची झाली. कोरोनाच्या कठीण प्रसंगातही आपल्या घरून चित्रिकरण करत अच्युत पोतदार यांनी व्यावसायिक निष्ठेला प्राधान्य दिलं.अच्युत पोतदार सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून दिसतात. विनायक ब्रम्हे म्हणजेच अप्पा ही लडीवाळ आजोबांची अच्युत पोतदार यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरासाठी जणू मायेची सावली झाली आहे. एक आजोबा, चार मामा आणि त्यांचा लाडोबा असलेल्या गोड भाचाच्या प्रेमाची गोष्ट जेव्हा ‘माझा होशील ना’ या मालिकेतून मांडण्याचा असाच वेगळा प्रयोग करायचे ठरले तेव्हा शिस्तप्रिय, प्रसंगी हळव्या आजोबांच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य कलाकाराची निवड करणे, हे आव्हान होते. परंतु आजोबांची ही व्यक्तिरेखा शब्दांतून साकार झाली तेव्हा नजरेसमोर फक्त एकच नाव होते ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार. “‘माझा होशील ना’ मालिकेतल्या प्रेमळ संवादांबरोबरच हातातला सोटा वर उचलून, हाणू का सोटा? असं म्हणणारे अप्पा सर्वांचे लाडके आजोबा झाले आहेत. ‘माझा होशील ना’ मालिकेच्या सेटवर सर्वात तरूण मी आहे, असं ते मिश्किलपणे म्हणतात. झी मराठीने अच्युत पोतदार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले व सर्वांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले.

हेही वाचा - रंगात रंगललेला 'तैमुर', करिना आणि अक्षयने होळीत दाखवला सयंम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.