ETV Bharat / sitara

झेब्रा एंटरटेन्मेंट करतंय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण - Utarand short film latest news

'उतरंड' या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येतायत. झेब्रा एंटरटेन्मेंट लवकरच आपल्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. 2020च्या सुरुवातीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

झेब्रा एंटरटेन्मेंट
author img

By

Published : Sep 30, 2019, 6:41 PM IST

वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या 'उतरंड' या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येतायत. झेब्रा एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेने पर्यावरणाचे महत्व पटवून एक समाजप्रबोधनपर उतरंड या लघुपटाची निर्मिती 2016 ला केली होती. त्यांच्या या लघुपटाला गेल्या दोन वर्षात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधे पुरस्कार मिळाले. आता झेब्रा एंटरटेन्मेंट लाइट हार्टेड कॉमेडी मराठी सिनेमा घेऊन येणार असल्याचे समजतंय.

या विषयी झेब्रा एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाउसचे निर्माते संजय गोळपकर म्हणतात, “आम्ही आमच्या निर्मिती संस्थेच्या स्थापनेनंतर उतरंड या लघुपटाची निर्मिती केली. उतरंडला विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाल्याने आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहोत. पदार्पणात एक निखळ मनोरंजनपर सिनेमा घेऊन येत आहोत."

या आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाविषयी सांगताना संजय गोळपकर म्हणाले, "संगीत दिग्दर्शक आणि गीतकार गणेश-सुरेश ह्या जोडीने उतरंड सिनेमाचे दिग्दर्शन केले. त्यांनीच आमच्या नव्या सिनेमाची कथा लिहीली आहे. लवकरच या सिनेमाचे नाव आणि स्टारकास्टची आम्ही घोषणा करू. हा चित्रपट तुम्ही आपल्या संपूर्ण कुटूंबासोबत एकत्र बसून पाहू शकाल, असा विनोदी सिनेमा आहे. याची मी ग्वाही देतो."

झेब्रा एंटरटेन्मेंट लवकरच आपल्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. 2020च्या सुरुवातीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.