ETV Bharat / sitara

यावर्षी तरी दादासाहेब फाळके पुरस्कार मराठमोळ्या सुलोचना दीदींना मिळेल का? - Ramdas Phutane, Ujwal Thengadi

मराठमोळ्या सिनेकर्मीच्या नावे असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार मराठी कलाकाराला मात्र का दिला जात नाही अशी ओरड सध्या सुरु झालेली आहे. प्रख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुलोचना दीदी यांना केंद्राने हा पुरस्कार तातडीने द्यायला हवा असे मत अनेक प्रतिष्ठित मंडळी व्यक्त करताना दिसत आहेत. तब्बल ५० वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा असे दिग्गज रामदास फुटाणे, उज्वल ठेंगडी आदी मान्यवरांनी सांगितले आहे.

sulochana
सुलोचना
author img

By

Published : Mar 5, 2021, 1:46 PM IST

मुंबई - दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या ‘कोरोनेशन थिएटर’मध्ये प्रदर्शित केला होता. त्यांना भारतीय सिनेसृष्टीचे जनक म्हटले जाते. भारत सरकार त्यांच्या नावे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना पुरस्कार देऊन गौरविते आणि तो अत्यंत मानाचा पुरस्कार समाजाला जातो. या मराठमोळ्या सिनेकर्मीच्या नावे असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार मराठी कलाकाराला मात्र का दिला जात नाही अशी ओरड सध्या सुरु झालेली आहे. प्रख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुलोचना दीदी यांना केंद्राने हा पुरस्कार तातडीने द्यायला हवा असे मत अनेक प्रतिष्ठित मंडळी व्यक्त करताना दिसत आहेत. तब्बल ५० वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा असे दिग्गज रामदास फुटाणे, उज्वल ठेंगडी आदी मान्यवरांनी सांगितले आहे.

sulochana-didi-
अमिताभ यांनी सुलोचना दीदींच्या वाढदिवसाला भेट दिली होती. हा फोटो बिग बी यांनी ट्विटरवर शेअर केला होता.
सुलोचना दीदींच्या ९०व्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा फाळके पुरस्कार सुलोचना दीदींना मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. तसेच अशा प्रकारची इच्छा लता दीदी (मंगेशकर), आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आदींनी व्यक्त केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुलोचना दीदींना द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. सुलोचना दीदींनी मराठी चित्रपटांबरोबरच अनेक हिंदी चित्रपट केले ज्यात वहिनी, बहीण, आई ई. व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांचे अनेक सुपरस्टार्स सोबतचे संबंध वात्सल्याचे, जिव्हाळ्याचे होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यात आईचा दर्जा दिला होता किंवा आहे व काही वर्षांपूर्वी बिग बी सुलोचना दीदींच्या प्रभादेवी येथील घरी पोहोचले होते, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. सुलोचना दीदींना त्यांच्या वाढदिवशी अनेक क्षेत्रातील मान्यवर खास भेट देतात ज्यात जेष्ठ समीक्षक आणि चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांचाही समावेश आहे. सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा असे तेही मानतात. ते म्हणाले, ’सुलोचनादीदींची मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन वाटचाल, अनुभव, अभिनय निष्ठा पाहता त्यांना यापूर्वीच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात यायला हवे होते. नायिका ते चरित्र भूमिका असा यशस्वी चौफेर प्रवास करताना त्या एकूणच बदलत्या चित्रपटसृष्टीच्या साथिदार आणि साक्षीदारदेखिल आहेत.’सुलोचनाताई मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकाला वंदनीय आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारने २००९ साली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविले होते. मात्र आजवर त्यांच्या योगदानाची दखल केंद्र सरकारने अजूनपर्यंत घेतली गेली नाहीये असे सर्व स्तरावर म्हटले जातेय. महाराष्ट्राच्या या माऊलीचा गौरव करा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ मंडळींनी केली पाहिजे.

हेही वाचा - आयकर विभागाची छापेमारी अजूनही सुरूच; अनुराग, तापसीची पुण्यात चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.