मुंबई - सध्या बायोपिकचा जोरदार ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरू आहे. डॉ. मनमोहन सिंग, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता यापाठोपाठ नरेंद्र मोदींवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हेच वारे वेबसीरिजकडेही वळाल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटाशिवाय मोदींवर आधारित वेबसीरिजही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मोदी असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे. एप्रिलपासून ही सीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. You know the leader, but do you know the man? असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. यावरून मोदींचा संघर्ष या सीरिजमध्ये दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
Now a 10-part *web series* on PM Narendra Modi... Eros Nowand Benchmark Pictures[Umesh Shukla and Ashish Wagh] to produce the biopic... Titled #Modi... Directed by Umesh Shukla [who directed #OhMyGod and #102NotOut]... Premieres in April 2019 on Eros Now... First look poster: pic.twitter.com/a6W0S6VftS
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Now a 10-part *web series* on PM Narendra Modi... Eros Nowand Benchmark Pictures[Umesh Shukla and Ashish Wagh] to produce the biopic... Titled #Modi... Directed by Umesh Shukla [who directed #OhMyGod and #102NotOut]... Premieres in April 2019 on Eros Now... First look poster: pic.twitter.com/a6W0S6VftS
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2019Now a 10-part *web series* on PM Narendra Modi... Eros Nowand Benchmark Pictures[Umesh Shukla and Ashish Wagh] to produce the biopic... Titled #Modi... Directed by Umesh Shukla [who directed #OhMyGod and #102NotOut]... Premieres in April 2019 on Eros Now... First look poster: pic.twitter.com/a6W0S6VftS
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2019
१०२ नॉट आऊट आणि ओह माय गॉडसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. ही सीरिज १० भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.