ETV Bharat / sitara

कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विराट मडके येतोय मोठ्या पडद्यावर - विराट मडके येतोय मोठ्या पडद्यावर

कुस्ती या खेळाचा थरार राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके ‘केसरी -saffron’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. प्रस्तुत या चित्रपटातून विराट मडके हा नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून तो मुळचा कुस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा आहे.

Virat Madake
विराट मडके
author img

By

Published : Feb 4, 2020, 4:27 PM IST

महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील कुस्ती या खेळाचा थरार राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके ‘केसरी -saffron’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटातून विराट मडके हा नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून तो मुळचा कुस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विराटने पैलवानाची भूमिका साकारण्यासाठी थेट खरा आखाडा गाठला आणि ‘हिंद केसरी’, ‘महान भारत केसरी’ रोहित पटेल व ‘महाराष्ट्र केसरी’, ‘रुस्तूम ए हिंद’ किताब पटकावलेल्या अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कसरतीला सुरुवात केली.

भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना विराट मडके म्हणाला की, ''मी कोल्हापूरचा असलो तरी २००५ पासून पुण्यात आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना मी प्रायोगिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. आजपर्यंत मी अनेक एकांकिकांमध्ये कामे केली आहेत. लहानपणासून मला अभिनयाबरोबरच खेळाची आवड आहे, विविध प्रकारच्या खेळात मी शाळा, महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामुळे मी कधी जिमला गेलो नसलो तरी माझी शरीरयष्टी उत्तम राहिली आहे. ‘केसरी’ची तयारी करताना मला खेळाडू असण्याचा मोठा फायदा झाला.

''कुस्तीच्या आखाड्यात पहिल्यांदा उतरणारी मुले कमी वयाची असतात त्यामुळे त्यांच्या शरीरात लवचिकता निर्माण होते, ती चपळता मिळवणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या काळात रोहित पटेल आणि नंतर अमोल बुचडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला प्रशिक्षण दिले, यामुळेच मी कुस्तीगीर दिसेल असा झालो आहे. अलीकडे अनेकदा बॉडी बिल्डिंग करणारी मुले इंजेक्शन किंवा इतर पर्याय निवडतात मात्र मी अशा कोणत्याही मार्गाचा वापर न करता फक्त आखाड्यातील कसरत आणि पौष्टिक आहार यावर लक्षकेंद्रीत केले होते'', असे विराटने सांगितले.

या विषयी बोलताना अमोल बुचडे म्हणाले, ''माझ्या आखाड्यात अनेक मुले कुस्तीचे प्रशिक्षण घेतात. विराटचा अनुभव माझ्यासाठी फार वेगळा आहे. चित्रपटात फक्त व्यक्तीरेखा साकाराची असल्याने त्याने फक्त कुस्तीच्या डावपेचांची माहिती घेतली असती तरी त्याच्यासाठी पुरेसे झाले असते मात्र त्याने प्रत्यक्ष कुस्तीच्या आखाड्यात कसरत करण्यासाठी मोठी मेहनत घेतले आहे. भूमिकेची तयारी करण्यापूर्वीचा विराट आणि लाल मातीच्या आखाड्यात घडलेला विराट यामध्ये मोठा फरक दिसतो, चित्रपटात दिसलेला विराट म्हणजे अभिनेत्याबरोबर खरा पैलवान आहे असे प्रेक्षकांना वाटेल यात शंका नाही. विराटमध्ये झालेला एकंदरीत बदल म्हणजे त्याच्या मेहनतीचा परिणाम आहे.''

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.