मुंबई - छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध झालेला अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विक्रांतने छोट्या पडद्यावरील मालिकांसोबतच डिजीटल माध्यमातूनही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावर त्याची वर्णी लागली आहे. आता तापसीसोबतदेखील तो आगामी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
#हसीनदिलरुबा
— taapsee pannu (@taapsee) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मिले तो दिल जवाँ निसार हो गया
शिकारी ख़ुद यहाँ, शिकार हो गया
“I maybe bad but I’m perfectly good at it”
Stepping into the world of #HaseenDillruba 🌹.
Can’t wait for you guys to meet HER in theatres on 18th September 2020! pic.twitter.com/mmjZs1lYdC
">#हसीनदिलरुबा
— taapsee pannu (@taapsee) December 17, 2019
मिले तो दिल जवाँ निसार हो गया
शिकारी ख़ुद यहाँ, शिकार हो गया
“I maybe bad but I’m perfectly good at it”
Stepping into the world of #HaseenDillruba 🌹.
Can’t wait for you guys to meet HER in theatres on 18th September 2020! pic.twitter.com/mmjZs1lYdC#हसीनदिलरुबा
— taapsee pannu (@taapsee) December 17, 2019
मिले तो दिल जवाँ निसार हो गया
शिकारी ख़ुद यहाँ, शिकार हो गया
“I maybe bad but I’m perfectly good at it”
Stepping into the world of #HaseenDillruba 🌹.
Can’t wait for you guys to meet HER in theatres on 18th September 2020! pic.twitter.com/mmjZs1lYdC
गूढ हत्येवर आधारित 'हसीन दिलरूबा' या चित्रपटात विक्रांतची वर्णी लागली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.


हेही वाचा -हिंदीसह तेलुगु आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित होणार 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'
या चित्रपटाबाबतची इतर माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तापसीने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'मिले तो दिल जवाँ निसार हो गया, शिकारी ख़ुद यहाँ, शिकार हो गया', असे कॅप्शन तिने या पोस्टरवर दिले आहे.
आनंद एल. राय या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट एक ट्विस्ट असणारी लव्ह स्टोरी राहणार आहे. प्रेक्षकांसाठी ही कथा नक्कीच नवीन असेल. तसेच, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, असे आनंद एल. राय यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -पर्यटन नगरी खजुराहोमध्ये रंगणार सात दिवसीय 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'
अमित त्रिवेदी हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत. पुढच्या वर्षी १८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.