ETV Bharat / sitara

‘पोरगं मजेतय’चे त्रिकुट, विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने, घेऊन येताहेत ‘सोयरीक’!

‘पोरगं मजेतय’ या मराठी चित्रपटाच्या निर्मिती नंतर ‘सोयरीक’ या चित्रपटाद्वारे विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने हे तिघेही पुन्हा एकत्र आले आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला, मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

soirik
‘सोयरीक’!
author img

By

Published : Jul 21, 2021, 5:31 PM IST

कोरोनामुळे लोकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला. लग्न म्हटलं की मोठ्ठा सोहळा, ज्यात अनेकांचा सहभाग असतो. परंतु या नतद्रष्ट महामारीने लोकांनाच एकमेकांपासून दूर राहण्यासाठी मजबूर केले. शासनाने तर जास्तीत जास्त, नवरा-नवरी, भटजी वगैरे सर्व जण मिळून, पन्नास लोकांना लग्नसोहळ्यात उपस्थित राहण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे काहींनी लग्न पुढे ढकलले तर काहींनी कशीबशी उरकून घेतली. लग्न म्हणजे अर्थातच ‘सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना आणि ती कधी, कुठे आणि कशी जुळेल या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात.

Vijay Shinde, Shashank Shende and Makrand
विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने, घेऊन येताहेत ‘सोयरीक’!

सध्याच्या कठीण काळात प्रत्येकालाच नात्याची व त्यातल्या आपलेपणाची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली आहे. आजवर आपल्या चित्रपटांतून सामाजिकतेचा वेध घेणारे दिग्दर्शक मकरंद माने ‘सोयरीक’ या चित्रपटातून नात्यांची मनोरंजक सफर प्रेक्षकांना घडविणार आहेत. या चित्रपटाबद्दल निर्माते विजय शिंदे, मकरंद माने, शशांक शेंडे उत्सुक असून काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास हे तिघेही व्यक्त करतात.

‘रिंगण’ या राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक मिळविणाऱ्या चित्रपटात दिग्दर्शक मकरंद माने आणि अभिनेता शशांक शेंडे एकत्र होते. मानवी नात्यांवरील भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला होता. आता तश्याच नात्यांवर आधारित ते ‘सोयरीक’ घेऊन येत आहेत. “‘नातं’.. म्हणायला जेवढा सोपा शब्द आहे तेवढाच जपायला कठीण आहे. मग तो जपताना त्यात सुरू होते ती स्वार्थ अन निःस्वार्थ यांच्यातील लढाई. ह्यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न आम्ही करीत आहोत”, असे दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले.

‘पोरगं मजेतय’ या मराठी चित्रपटाच्या निर्मिती नंतर ‘सोयरीक’ या चित्रपटाद्वारे विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने हे तिघेही पुन्हा एकत्र आले आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला, मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कौटुंबिक धाटणीच्या या मनोरंजक चित्रपटाचा मुहूर्त अकलूज येथे चित्रीकरणाने संपन्न झाला. अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी ‘सोयरीक’ या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

हेही वाचा - राज कुंद्राने माझे फोटोज आणि व्हीडिओज बेकायदेशीररित्या वापरले - पूनम पांडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.