मुंबई - 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून आघाडीचा अभिनेता बनलेला विकी कौशल त्याच्या आगामी 'सरदार उधम सिंग' या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचं लंडन येथील शुटिंगही पूर्ण झालं आहे. आता अमृतसर येथे या चित्रपटाचे दुसरे शूटिंग शेड्यूल पूर्ण होणार आहे.
चित्रपटाची संपूर्ण टीम अमृतसर येथे रवाना झाली आहे. अमृतसर येथे पोहोचल्यावर विकीने सर्वात आधी सुवर्णमंदिराला भेट दिली. त्याने त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' बायोपिकमध्ये 'दंगल गर्ल' साकारणार 'ही' भूमिका
दिग्दर्शक सुजित सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
कोण आहेत सरदार उधम सिंग -
सरदार उधम सिंग हे स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक होते. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार असणाऱ्या मिशेल ओ डायर यांची हत्या केली होती. त्यांची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.
-
Running my fingers thru the bullet holes at Jallianwala Baug, little did I know that 1 day I'd get a chance to bring alive the lesser known martyr, UDHAM SINGH. #SardarUdhamSingh @ShoojitSircar @ronnielahiri #SheelKumar @writish #ShubenduBhattacharya @filmsrisingsun @sardarudham pic.twitter.com/VxAfmGLYjB
— Vicky Kaushal (@vickykaushal09) April 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Running my fingers thru the bullet holes at Jallianwala Baug, little did I know that 1 day I'd get a chance to bring alive the lesser known martyr, UDHAM SINGH. #SardarUdhamSingh @ShoojitSircar @ronnielahiri #SheelKumar @writish #ShubenduBhattacharya @filmsrisingsun @sardarudham pic.twitter.com/VxAfmGLYjB
— Vicky Kaushal (@vickykaushal09) April 30, 2019Running my fingers thru the bullet holes at Jallianwala Baug, little did I know that 1 day I'd get a chance to bring alive the lesser known martyr, UDHAM SINGH. #SardarUdhamSingh @ShoojitSircar @ronnielahiri #SheelKumar @writish #ShubenduBhattacharya @filmsrisingsun @sardarudham pic.twitter.com/VxAfmGLYjB
— Vicky Kaushal (@vickykaushal09) April 30, 2019
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, विकीला अलिकडेच 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच 'संजू' चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा -शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच करणार चित्रपटाची घोषणा
'सरदार उधम सिंग' या चित्रपटापूर्वी विकी 'भूत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो भूताच्या रुपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचाही फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाशिवाय तो करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटातही झळकणार आहे.