ETV Bharat / sitara

मराठी सिनेसृष्टीत 'सन्नाटा' : ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे करोनामुळे निधन - ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे करोनाची लागण झाल्यामुळे निधन आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही पार पडली होती. आज दुपारी १२.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जिस देश में गंगा रहता है’ या चित्रपटात नांदलस्करांनी सन्नाटा ही भूमिका साकारली होती. हे भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.

kishor-nandalskar
किशोर नांदलस्कर
author img

By

Published : Apr 20, 2021, 4:25 PM IST

मुंबई- ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचं आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

किशोर नांदलस्कर यांनी रंगभूमीपासून सुरू केलेला प्रवास दूरदर्शन मालिका ते चित्रपट असा दीर्घ होता. मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात त्यांची कारकिर्द गाजली.

किशोर नांदलस्कर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’,‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन,’ ‘नाना करते प्यार’ अशा गाजलेल्या ४० हून अधिक नाटकातून त्यांनी काम केले. 'खाकी', 'वास्तव', ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, 'सिंघम' यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटातून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या.

जिस देश में गंगा रहता है’ या चित्रपटात नांदलस्करांनी सन्नाटा ही भूमिका साकारली होती. हे भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.गोविंदासोबतची त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासारखी होती.

असंख्य मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. यामध्ये 'मिस यू मिस', 'भविष्याची ऐशी तैशी', 'गाव थोर पुढारी चोर', 'जरा जपुन करा', 'हैलो गंधे सर', 'मध्यममार्ग - द मिडिल क्लास',‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा चित्रपटांचा समावेश होतो.

हेही वाचा - हुमा कुरेशी म्हणते, ''जॅक स्नायडरसोबत गप्पा हा वेगळ्या जगात वावरल्याचा अनुभव''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.