मुंबई - अभिनेता शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वीर-जारा' चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राणी मुखर्जीने या चित्रपटाच्या सेटवरील काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. त्यांच्यासोबतच्याही काही आठवणींना राणीने उजाळा दिला आहे.
'यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. ते नेहमी कॅमेराच्या मागे राहत असत. आमच्या कामाकडे त्याचं काटेकोर लक्ष असायचं. कलाकारांकडुन व्यवस्थित काम करून घेणं त्यांना चांगल्याप्रकारे माहिती होतं', असे राणीने म्हटलं आहे.
हेही वाचा -आयुष्मान खुरानाच्या 'बाला'ची घोडदौड, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई
'वीर -जारा' चित्रपटात राणीने पाकिस्तानी वकिलाची भूमिका साकारली होती. शाहरुख खानसोबतचाही अनुभव तिने शेअर केला. या चित्रपटात शाहरुख उत्तरार्धात वृद्धाच्या भूमिकेत दाखवला आहे. शाहरुखला अशाप्रकारे वृद्ध अवतारात पाहणं, माझ्यासाठी फारच कठिण असल्याचं, राणीनं म्हटलं आहे. त्याच्यासोबत तिने इतर चित्रपटांमध्ये रोमॅन्टिक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या चित्रपटात शाहरुखच्या मुलीच्या वयाची भूमिका तिने साकारली होती.
या चित्रपटाने २००४ साली बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली होती. अभिनेत्री प्रिती झिंटानेही या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करुन चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
Celebrating #15YearsOfEternalVeerZaara ❤❤❤
— Preity Zinta Fandom (@PZ_Fandom) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
There will never be a film like this again ✨#PreityZinta #ShahrukhKhan #VeerZaara #RaniMukerji #15YearsOfVeerZaara pic.twitter.com/8wCiZ7JisQ
">Celebrating #15YearsOfEternalVeerZaara ❤❤❤
— Preity Zinta Fandom (@PZ_Fandom) November 12, 2019
There will never be a film like this again ✨#PreityZinta #ShahrukhKhan #VeerZaara #RaniMukerji #15YearsOfVeerZaara pic.twitter.com/8wCiZ7JisQCelebrating #15YearsOfEternalVeerZaara ❤❤❤
— Preity Zinta Fandom (@PZ_Fandom) November 12, 2019
There will never be a film like this again ✨#PreityZinta #ShahrukhKhan #VeerZaara #RaniMukerji #15YearsOfVeerZaara pic.twitter.com/8wCiZ7JisQ
हेही वाचा -'तान्हाजी'च्या निमित्ताने अजयच्या चित्रपटाचं शतक, पाहा खास व्हिडिओ