ETV Bharat / sitara

वीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा, रणदीप हुडा साकारणार मुख्य भूमिका

वीर सावरकरांवर बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा वि. दा. सावरकरांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट जून 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

author img

By

Published : Mar 23, 2022, 1:04 PM IST

रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत
रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत

मुंबई - शहीद दिवस 2022 निमित्त निर्मात्यांनी वीर सावरकरांवर बायोपिकची घोषणा केली. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा वि. दा. सावरकरांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट जून 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर विविध ठिकाणी होणार आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला वेगळ्या स्पेक्ट्रममधून अधोरेखित करेल. या बायोपिकचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.

रणदीप हुड्डाला या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल आनंद वाटतो. आपल्या निवडीबद्दल बोलताना रणदीप म्हणाला, "असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली भूमिका बजावली आहे. तथापि, प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. विनायक दामोदर सावरकर हे या गायब झालेल्या नायकांपैकी सर्वात वादग्रस्त, गैरसमज असलेले आणि प्रभावशाली व्यक्ती आहेत आणि त्यांची कहाणी सांगायलाच हवी." निर्माता संदिप सिंगसोबत रणदीप हुडा दुसरा बायोपिक करीत आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये सरबजीत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. याविषयी बोलताना रणदीप म्हणाला, "सरबजीतनंतर संदीपसोबत स्वतंत्र वीर सावरकरांसाठी काम करताना मला आनंद होत आहे. ही भूमिका साकारणे आणखी एक आव्हानात्मक असेल."

वीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा
वीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा

जवळपास वर्षभरापासून या विषयावर काम करणारे दिग्दर्शक महेश व्ही. मांजरेकर यांच्या दृष्टीने ही एक चपखल सिनेमॅटिक कथा आहे. याविषयी सांगताना मांजरेकर म्हणाले, "आम्ही दुर्लक्ष केलेल्या कथा सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वतंत्र वीर सावरकर हा एक दमदार सिनेमा असेल. ही कथा आम्हाला आमच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास भाग पाडेल. मला संदीप सिंगसोबत काम करायचे आहे आणि मला आनंद आहे की आम्ही हा चित्रपट एकत्र करत आहोत.''

स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्सचे आनंद पंडित आणि लेजेंड स्टुडिओचे संदीप सिंग आणि सॅम खान यांनी केली असून रुपा पंडित आणि जय पंड्या याचे सहनिर्माते आहेत. रणदीपच्या अभिनय पराक्रमाचे कौतुक करताना निर्माता संदीप सिंग म्हणतात, "भारतात असे फार कमी अभिनेते आहेत जे आपल्या प्रतिभेने जादू निर्माण करू शकतात आणि रणदीप त्यांच्यापैकी एक आहे. वीर सावरकरांना भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त पात्र मानून, मी फक्त रणदीपचाच विचार करू शकतो." ते पुढे म्हणतात, "वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येत नाही, मला आश्चर्य वाटते की आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वीर सावरकरांचा उल्लेख का नाही?"

आनंद पंडित मोशन पिक्चर्सचे निर्माते आनंद पंडित म्हणतात, "सिनेमा हे एक सर्जनशील माध्यम आहे जे विविध विचारप्रक्रिया साजरे करते. स्वातंत्र्य वीर सावरकर सारखे चित्रपट अधिक आकर्षक सार्वजनिक संवाद निर्माण करण्यात मदत करतील. महेश आणि रणदीप यांच्या नेतृत्वाखाली, मला खात्री आहे, आम्ही प्रेक्षकांसाठी काहीतरी अविस्मरणीय घडवून आणू", असा आत्मविश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने खरेदी केली ८० लाखाची आलिशान कर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.