मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटाचे अलिकडेच शूटिंग पूर्ण झाले आहे. वरुणने या चित्रपटाशी जुळलेल्या बऱ्याच आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. 'एबीसीडी २' ते 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटाचा अनुभव त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.
वरुणसोबत 'स्ट्रिट डान्सर'मध्ये श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रेमो डिसूजाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लंडन, दुबई, मुंबई या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'एबीसीडी' चित्रपटात 'डान्स इंडिया डान्स' रिअॅलिटी शोमधुन नावारुपास आलेले डान्सर्स झळकले होते. त्यांच्यामुळेच हा प्रवास 'स्ट्रिट डान्सर्स' पर्यंत येऊन पोहोचलाय, असे वरुणने या व्हिडिओत म्हटले आहे.