ETV Bharat / sitara

तब्बल ८३० किलोमीटर सायकल चालवत ‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!

शोएब बागवान या युवकाने मुंबई ते नागपूर असा 830 किलो मिटरचा प्रवास सायकल वरुन केला. या प्रवासात त्याने जयंती या आगामी चित्रपटाचे प्रमोशन केले. सोशल मीडियाद्वारे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘जयंती’च्या पोस्टर आणि टिझरने तसेच चित्रपटाच्या विषयाच्या प्रेमात असलेला हा तरुण आहे. आपणसुद्धा या चित्रपटाची प्रसिद्धी करावी असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तो प्रत्यक्षात उतरविला.

‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!
‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!
author img

By

Published : Oct 27, 2021, 10:31 PM IST

पूर्वी, खासकरून ग्रामीण व निमशहरी भागात, नाटक, सिनेमा आदी कार्यक्रमांची माहिती बैलगाडी, जीप अथवा सायकल वरून दिली जायची. दवंडी पिटली जायची. तसे त्या कार्यक्रमाचे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवले जायचे. परंतु आता इंटरनेटच्या जमान्यात घरबसल्याही चित्रपटाच्या प्रोमोशनसकट अनेक गोष्टी करता येतात. परंतु काही जण अजूनही जुन्या पद्धतींना सन्मान देताना दिसतात. आता हेच बघाना, शोएब बागवान या युवकाने, जो मुंबई येथील रहिवासी असून एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये वर्कशॉप मॅनेजर या पदावर काम करत आहे, सायकलवर प्रवास करत आगामी ‘जयंती’ या चित्रपटाचे प्रोमोशन केले. सोशल मीडियाद्वारे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘जयंती’च्या पोस्टर आणि टिझरने तसेच चित्रपटाच्या विषयाच्या प्रेमात असलेला हा तरुण आहे. आपणसुद्धा या चित्रपटाची प्रसिद्धी करावी असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तो प्रत्यक्षात उतरविला.

‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!
‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!

सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या मुठीत आणून ठेवलं आहे. जगभरातल्या घडामोडी, बातम्या तसेच नव्या गोष्टी अगदी एक क्लिक वर आपल्याला समजतात पण आजही काही ठिकाणं अशी आहेत जिथे पारंपरिक पद्धतीच्या जाहिरातबाजीने प्रभाव अधिक प्रखरतेने पडताना आपण पाहतो. १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या "जयंती" या सिनेमाबद्दल काहीसं असंच म्हणावं लागेल. चित्रपटाच्या नावावर आणि टिझरच्या प्रेमात असलेल्या एका युवकाने चक्क या चित्रपटाचं प्रोमोशन एक वेगळ्या अंदाजात करण्याची इच्छा सिनेमाच्या दिग्दर्शकांसमोर ठेवली आणि त्याची ही इच्छा ऐकून जयंतीची संपूर्ण टीम अवाक झाली.

‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!
‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!

पूर्वी कोणत्याही चित्रपटाची, नाटकाची माहिती सांगण्यासाठी काही लोकं चालत, नंतर कालांतराने सायकल किंवा गाड्यांतून फिरत दवंडी देत त्या चित्रपटाबद्दल किंवा एखाद्या नाटकाबद्दल लोकांना माहिती द्यायचे आणि स्थानिक त्या ठरलेल्या वेळी एकत्र येऊन चित्रपट किंवा नाटक पहायचे. अगदी त्याचप्रमाणे शोएब दादर-चैत्यभूमी ते नागपूर-दीक्षाभूमी हा तब्बल ८३० किलोमीटरचे अंतर सायकल ने पार करून चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत ठरलेल्या ठिकाणांहून जात गावाच्या वेशीवर येत लोकांना याबद्दल सांगणार आहे. यासाठी शोएबने त्याच्या कामावरून तब्बल एक महिन्यांची सुट्टी घेतली आहे.

जयंती टित्रपटाचा टिझर

याबद्दल शोएब म्हणाला, "जयंती जसं याचं नाव जितकं हटके आहे तितक्या हटके पद्धतीने याची प्रसिद्धीदेखील झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना या चित्रपटाबद्दल समजावं आणि एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहचावा हे या सायकल राईडचं उद्दिष्ट आहे." दिग्दर्शक शैलेश नरवाडे म्हणाले, "शोएब सारखे तरुण या चित्रपटाला प्रेक्षक म्हणून लाभले यातच सर्वकाही आलं. प्रदर्शनाआधीच आम्हाला सर्वच वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे."

दशमी स्टुडिओज प्रस्तुत मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा दर्जेदार मराठी सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - 'विक्रम वेधा' : ह्रतिक रोशनने पूर्ण केला थरारक अॅक्शन सीक्वेन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.