जयपूर - राजस्थान आवासन मंडळच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'बॉलिवूड म्यूझिकल नाईट'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूडचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या स्वरांनी वातावरणात उत्साह निर्माण केला होता. त्यांच्या गायकीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
मानसरोवर येथील नीरजा मोदी स्कुल परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे विशेष आकर्षण होते. त्यांनी आपले सदाबहार गाणी गाऊन संगीतमय वातावरण निर्माण केले होते.
हेही वाचा -'भूल भुलैय्या २' मध्येही राजपाल यादव यांच्या कॉमेडीचा लागणार तडका, शूटिंगला सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात उदित नारायण यांची पत्नी दीपा नारायण झा यांनी सुपरहिट 'लग जा गले' आणि 'प्रेम रतन धन पायो' ही गाणी गाऊन केली. त्यानंतर अलका याज्ञिक यांनी एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अलका याज्ञिक यांनी 'कुछ कुछ होता है, 'गजब का है दिन, 'लाल दुपट्टा उड़ गया रे, 'राहों में उनसे मुलाकात हो गई' आणि 'गली में आज चांद निकला' यांसारखी गाणी गायली. तर, उदित नारायण यांच्या 'पापा कहते है बड़ा नाम करेगा' या गाण्यावर प्रेक्षकांनीही ठेका धरला होता.
हेही वाचा -फरहान-शिबानीच्या नात्याला दोन वर्ष पूर्ण, फोटो शेअर करुन दिल्या रोमॅन्टिक शुभेच्छा
या कार्यक्रमात मुख्य आयोजक महेश जोशी, आवासन मंडळचे आयुक्त पवन अरोरा, मुख्यमंत्री सचिव कुलदीप रांका, आवासन मंडळचे प्रमुख सचिव भास्कर सावंत आणि अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. शहरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम थाटात पार पडला.