ETV Bharat / sitara

‘पांडू’ तर्फे कॉमेडी किंग नटवर्य दादा कोंडकेंना श्रद्धांजली!

author img

By

Published : Dec 3, 2021, 7:44 AM IST

कॉमेडी किंग नटवर्य दादा कोंडकेंना ‘पांडू’ चित्रपटातून श्रद्धांजली (Tribute to Dada Kondke ) देण्यात आली असून दादांच्या ‘पांडू हवालदार’ चा हा आधुनिक अवतार आहे. बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. पांडू चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.

Pandu
पांडू

मुंबई - छोट्या पडद्यावरील विनोदी जोडगोळी म्हणजे भाऊ कदम ( Bhalchandra Kadam ) आणि कुशल बद्रिके ( Kushal Badrike ) ही जोडी ‘पांडू’ (Pandu) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आली आहे. कॉमेडी किंग नटवर्य दादा कोंडकेंना ‘पांडू’ चित्रपटातून श्रद्धांजली (Tribute to Dada Kondke ) देण्यात आली असून दादांच्या ‘पांडू हवालदार’ चा हा आधुनिक अवतार आहे. बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. पांडू चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.

पांडू या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते तीही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा. मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते.

विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे.

हा चित्रपट पूर्णतः विनोदी अंगाने जाणारा असून तो प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि त्यांचा ताण दूर करेल असा विश्वास झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांना वाटतो. अवधूत गुप्ते यांच्या संगीताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत, बुरुम बुरुम ने २० लाख व्ह्यूज तर केळेवाली गाण्याने अवघ्या २४ तासात १० लाख व्ह्यूज मिळवलेत. चित्रपटाचा हा ट्रेलरही पांडूबद्दल अधिक उत्सुकता जागृत करणारा ठरला. येत्या 3 डिसेंबरला संपूर्ण राज्यभरातील चित्रपटगृहांत ‘पांडू’ प्रदर्शित झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.