मराठी चित्रपट नेहमीच विषयांच्या वैविध्यतेसाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटांमध्ये संहितेला सर्वात जास्त महत्व दिलं जातं आणि त्यामुळेच मराठीला हिंदीसकट इतर भाषिक फिल्ममेकर्स सलाम करतात. मराठी चित्रपट हा मनोरंजनाच्या दृष्टीने जेवढा प्रगल्भ आहे तेवढाच तो सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात सुद्धा आघाडीवर आहे. मराठी सिनेमा हा नेहमीच आपल्या कथेतून समाजाला आरसा दाखवत आला असून आता असाच एक सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग यांच्यावर आधारलेला 'जिंदगानी' हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खोदडगावाची ही कथा असून या चित्रपटात शशांक शेंडे हे प्रमुख भूमिकेत असून वैष्णवी शिंदे या नवोदित अभिनेत्रीचे या चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमधून खोदडगावाशी आपली ओळख होतेच पण त्याच बरोबर आपल्याला या चित्रपटातील मुख्य पात्रांची सुद्धा झलक पाहायला मिळते आहे.
निसर्गाच्या कुशीत राहत असताना त्याच निसर्गाचे आपण ज्यावेळी शोषण करू लागतो त्यावेळी त्या शोषणाने त्याचा होणारा उद्रेक आणि मानवी भावनांचं भावविश्व सांगणाऱ्या 'जिंदगानी'चे दिग्दर्शन आणि लेखन विनायक साळवे यांनी केले आहे तर सुनीता शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नर्मदा सिनेव्हीजन्सच्या या पहिल्या वहिल्या कलाकृतीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार मिळवले असून क्राउन वूड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा 'सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट' म्हणून गौरव करण्यात आला आहे.
"या चित्रपटाची कथा ही एका गावाची आणि तिथल्या गावकऱ्यांची कथा असून त्यांच्या संघर्षाची आहे. यातून निसर्गाचं जे शोषण मानव कळत नकळत करतो त्याबद्दल भाष्य हा चित्रपट करतो. चित्रपटाची निर्मिती करण्यामागे हाच हेतू होता की एक उत्तम पर्यावरणवादी चित्रपट लोकांसमोर यावा आणि आपली समाजाप्रती जी जबाबदारी आहे ती पूर्ण व्हावी हा उद्देश या निर्मितीमागचा आहे," असे चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता शिंदे म्हणाल्या.
‘जिंदगानी’ हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - Shweta Tiwari In Trouble : श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ, गृहमंत्र्यांनी दिले पोलीस चौकशीचे आदेश