फत्तेशिकस्त या आगामी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढताना दिसत आहे. आजवर वेगवेगळ्या व्यक्तीरेखांची पोस्टर्स रिलीज करण्यात आली. यातून चित्रपटाचे कथानक आणि वैभवशाली इतिहासामध्ये पुन्हा डोकावण्याची संधी मिळणार असल्यामुळे मिळणारे समाधान दिसून आले. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज केला जाणार आहे.
-
Trailer out tomorrow... New poster of #Marathi film #Fatteshikast... Stars Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Annup Sonii, Ankit Mohan, Mrunmayee Deshpande, Nikhil Raut and Sameer Dharmadhikari... Directed by Digpal Lanjekar... 15 Nov 2019 release. #AAFilms #AlmondsCreations pic.twitter.com/i4rEnEiQwh
— taran adarsh (@taran_adarsh) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trailer out tomorrow... New poster of #Marathi film #Fatteshikast... Stars Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Annup Sonii, Ankit Mohan, Mrunmayee Deshpande, Nikhil Raut and Sameer Dharmadhikari... Directed by Digpal Lanjekar... 15 Nov 2019 release. #AAFilms #AlmondsCreations pic.twitter.com/i4rEnEiQwh
— taran adarsh (@taran_adarsh) October 9, 2019Trailer out tomorrow... New poster of #Marathi film #Fatteshikast... Stars Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Annup Sonii, Ankit Mohan, Mrunmayee Deshpande, Nikhil Raut and Sameer Dharmadhikari... Directed by Digpal Lanjekar... 15 Nov 2019 release. #AAFilms #AlmondsCreations pic.twitter.com/i4rEnEiQwh
— taran adarsh (@taran_adarsh) October 9, 2019
राजमाता जिजाऊसाहेब, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, केशर, बाळाजी, चिमणाजी, किसना यासारख्या योध्यांच्या पराक्रमाची गाथा फत्तेशिकस्त या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी स्टारकास्टही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीच्या कथा नेहमी इतिहासात पाहायला मिळतात. आता 'फतेशिकस्त'च्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती १५ नोव्हेंबरला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.