मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफचे अॅक्शन व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत. फिटनेसबाबतही तो जागरूक असतो. त्याच्या फिटनेसचे फोटो आणि व्हि़डिओ देखील तो शेअर करत असतो. त्याचे काही चित्तथरारक स्टंटही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. त्याचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये टायगर चक्क समुद्रात स्टंट करताना दिसतो.
टायगरच्या या व्हिडिओवर बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत २० लाख लोकांनी पाहिले आहे. यावरूनच त्याच्या स्टंटच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक
काही दिवसांपूर्वीच टायगर हृतिक रोशनसोबत 'वॉर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले आहेत. या चित्रपटातील हृतिकसोबतची त्याची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. आता तो त्याच्या 'बागी ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत रितेश देशमुखचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. तसेच श्रद्धा कपूर त्याच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.
अंकिता लोखंडे आणि चंकी पांडे यांचीही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याच वर्षी हा चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित होईल.
हेही वाचा -सारा-कार्तिकच्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित, चाहते मात्र संभ्रमात