मुंबई - लॉकडाऊनमुळे घरातच असणाऱ्या लोकांसाठी खूशखबर आहे. रामायाण, महाभारत मालिकांच्या पुनः प्रसारणानंतर अजून एक मालिका चाहत्यांना बघायला मिळणार आहे. तीन मे पासून दूरदर्शन चॅनलवर श्री कृष्णा मालिकेचे प्रसारण केले जाणार आहे.
श्री कृष्णाच्या महिमेवर आधारित या मालिकेचे प्रसारण रोज रात्री नऊ वाजल्यापासून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी ट्विट केले, की रविवारी ३ मेपासून रोज रात्री नऊ वाजल्यापासून श्री कृष्णा मालिका बघा. कृष्णाच्या महिमेवर आधारित ही मालिका तुम्ही डी डी नॅशनलवर पाहू शकता.
रामायण आणि महाभारत प्रसारणानंतर श्री कृष्णा मालिका दाखवण्याचा निर्णय दूरदर्शन चॅनलने घेतला आहे.
विशेष म्हणजे, श्री कृष्णा या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती रामायण मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांनी केली आहे. रामानंद यांच्या या मालिकेत सर्वदमन डी बॅनर्जी यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती.