ETV Bharat / sitara

मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले पैलू उलगडणारा मराठी चित्रपट 'रूप नगर के चीते'!

लॉकडाऊनच्या आधीपासूनच मराठी चित्रपटांच्या निर्मितीत अमराठी नावं दिसू लागली होती. त्या यादीमध्ये अजून एक नाव जोडले जातेय ते म्हणजे मनन शाह. बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.

author img

By

Published : Jan 19, 2021, 10:58 AM IST

मुंबई मराठी चित्रपट 'रूप नगर के चीते'!
मुंबई मराठी चित्रपट 'रूप नगर के चीते'!

मुंबई - कोरोनामुळे देशातील बिघडलेली परिस्थिती आता नॉर्मल होत चालली आहे हे नवीन चित्रपटांच्या संख्येवरून लक्षात येईल. लॉकडाऊनच्या आधीपासूनच मराठी चित्रपटांच्या निर्मितीत अमराठी नावं दिसू लागली होती. त्या यादीमध्ये अजून एक नाव जोडले जातेय ते म्हणजे मनन शाह. बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.

'रूप नगर के चीते' असे लक्ष्यवेधी शीर्षक असलेल्या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आता मराठी सिनेमाचं शीर्षक असे हिंदी का? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल, पण त्यामागील कारणही तसंच आहे. 'रूप नगर के चीते' हे सिनेमाचं शीर्षक ९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात असलेल्या 'हम रूप नगर के चीते है, शिकार पर ही जीते है' या गाजलेल्या संवादावरून प्रेरीत आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले दोन चीते म्हणजेच जीवलग मित्रांवर बेतलेला असणे हे देखील शीर्षक 'रूप नगर के चीते' ठेवण्यामागील दुसरं कारण आहे.

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'स्कूल, कॅालेज आणि लाईफ' या आगामी पहिल्या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणारे विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चं दिग्दर्शन करीत आहेत. या सिनेमात दोन मित्रांच्या कथेसोबतच मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू सादर करण्यात आले आहेत. 'रूप नगर के चीते' हा सिनेमा दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एक घटना घडल्यानंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार आहे.

या निमित्ताने मराठीतील दोन चित्यांचा म्हणजेच जीवलग मित्रांचा ऑनस्क्रीन प्रवास आणि त्यांची अनोखी कथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे, या चित्रपटातून. लक्षवेधी शीर्षक आणि उत्कंठावर्धक कथानक असलेला 'रूप नगर के चीते' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.