ETV Bharat / sitara

देहदाना विषयी जागृती निर्माण करणारा चित्रपट ‘८ दोन ७५’!

author img

By

Published : Feb 25, 2022, 11:50 AM IST

'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच पुणे येथे चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाने मिळवलेल्या या भरीव कामगिरीचा कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे.

८ दोन ७५
८ दोन ७५

मुंबई - अवयवदान हे आधुनिक काळातील श्रेष्ठ दान मानले जाते. परंतु याविषयी लोकांची अनास्थाच दिसून येते आणि अनेकांना याविषयी माहितीही नसते. म्हणूनच देहदाना विषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दिग्दर्शक सुश्रुत भागवत घेऊन येताहेत आशयघन चित्रपट ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेच्या या ‘८ दोन ७५’ चित्रपटाला अजूनपर्यंत ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी टीम
८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी टीम

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या अनोख्या नावानेच चर्चेत असलेल्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच पुणे येथे चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाने मिळवलेल्या या भरीव कामगिरीचा कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात नावापासूनच वेगळेपण आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आल्यानंतर चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं. आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात पुरस्कार पटकावले आहेत.

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी पोस्टर
८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी पोस्टर

आजवर फ्रान्स, सर्बिया, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कोलकाता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील फेस्टिव्हल्स मध्ये ह्या चित्रपटास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. देश आणि परदेशातल्या अनेक भाषांत अवयव दानावरती चित्रपट झालेले असले तरी ‘८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी’ हा देहदान आणि त्याविषयाची जागृती निर्माण करणारा चित्रपट आहे. बहुधा ह्या विषयावर झालेला कोणत्याही भाषेतला हा पहिला सिनेमा असावा. आता प्रेक्षकांमध्ये ‘८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी’ असं नाव आणि देहदान हा विषय ह्याचा संबंध काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्ले व सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन केले आहे.

उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं असून ‘८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - शिबानी दांडेकरने शेअर केले मेहेंदी समारंभातील आनंदाचे क्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.