ETV Bharat / sitara

नेटीझन्सच्या मते, 'थप्पड'चा ट्रेलर म्हणजे 'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकाला लगावलेली कानफडीत

author img

By

Published : Jan 31, 2020, 11:59 PM IST

थप्पडच्या ट्रेलरने इंटरनेटवर प्रचंड वाहवा मिळवली आहे. बहुतेकांना हा ट्रेलर म्हणजे कबीर सिंग चित्रपटाच्या दिग्दर्शकाला लगावलेली कानफडीत असल्याचे वाटते.

Thappad trailer a 'tight slap'
थप्पडच्या ट्रेलरने इंटरनेटवर प्रचंड वाहवा

मुंबई - अनुभव सिन्हा यांच्या थप्पड या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. नेटीझन्सना हा ट्रेलर म्हणजे कबीर सिंग सिनेमाचा दिग्दर्शक संदिप रेड्डी वान्गा याला मारलेली थप्पड असल्याचे वाटते.

सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंग चित्रपटात एक सीन थप्पड मारतानाचा होता. त्याचे समर्थन दिग्दर्शक संदिप रेड्डी वान्गाने केले होते. यात हिरो हिरॉईनला थप्पड मारतो. यावर ती कोणतीही रिएॅक्शन देताना दिसली नव्हती.

या सीनचे समर्थन दिग्दर्शकाने केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जेव्हा प्रेमात बुडालेले असता तेव्हा प्रचंड प्रामाणिकता असते. त्यात जर तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीवर हात उचलला त्यात गैर काही नाही. थप्पड मारण्याचा हक्क तुम्हाला नसेल तर त्यात काही तथ्य नाही असे मला वाटते, असे संदिप रेड्डी वान्गा म्हणाला होता.

थप्पड या चित्रपटात पार्टी सुरू असताना नवरा पत्नीवर हात उचलतो आणि थप्पड मारतो. पत्नी हा अपमान सहन करीत नाही असा विषय आहे. कबीर सिंगच्या दिग्दर्शकाच्या विचारांना या सिनेमाने थेट आव्हान दिल्याचे दिसते. नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.