ETV Bharat / sitara

'जयललिता' यांच्या भूमिकेतील कंगनाची पहिली झलक, पाहा खास व्हिडिओ - Kangna ranaut latest news

'थलायवी' असं जयललिता यांच्या बायोपिकचं नाव आहे. या बायोपिकसाठी कंगनाच्या लूकवर अतिशय मेहनत घेण्यात आली आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कंगनाचा लूक अगदीच अनोख्या रुपात सादर करण्यात आला आहे.

'जयललिता' यांच्या भूमिकेतील कंगनाची पहिली झलक, पाहा खास व्हिडिओ
author img

By

Published : Nov 23, 2019, 4:51 PM IST

मुंबई - बॉलिवूडची क्विन कंगना रनौत ही जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. नुकतीच या चित्रपटातील कंगनाची पहिली झलक समोर आली आहे. तर, जयललिता यांचा अभिनेत्रीपासून सुरू झालेला प्रवास राजकीय क्षेत्रापर्यंत कसा पोहोचतो, याचाही एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

'थलायवी' असं जयललिता यांच्या बायोपिकचं नाव आहे. या बायोपिकसाठी कंगनाच्या लूकवर अतिशय मेहनत घेण्यात आली आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कंगनाचा लूक अगदीच अनोख्या रुपात सादर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्येही जयललिता यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दाखवण्यात आली आहे. कंगनाचा खास लूक यामध्ये पाहायला मिळतो. 'एक सुपरस्टार अभिनेत्री ते एक क्रातीकारी नेत्या. एक असं नाव जे तुम्हाला माहिती आहे. एक अशी कथा जी तुम्हाला माहिती नाही', अशा ओळी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात.विजय यांचे दिग्दर्शन असलेला या बायोपिकची निर्मिती विष्णू इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी केली आहे. २६ जुन २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:

'जयललिता' यांच्या भूमिकेतील कंगनाची पहिली झलक, पाहा खास व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूडची क्विन कंगना रनौत ही जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट चर्चत आहे. नुकतीच या चित्रपटातील कंगनाची पहिली झलक समोर आली आहे. तर, जयललिता यांचा अभिनेत्रीपासून सुरू झालेला प्रवास राजकिय क्षेत्रापर्यंत कसा पोहोचतो, याचाही एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

'थलायवी' असं जयललिता यांच्या बायोपिकचं नाव आहे. या बायोपिकसाठी कंगनाच्या लूकवर अतिशय मेहनत घेण्यात आली आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कंगनाचा लूक अगदीच अनोख्या रुपात सादर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्येही जयललिता यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दाखवण्यात आली आहे. कंगनाचा खास लूक यामध्ये पाहायला मिळतो. 'एक सुपरस्टार अभिनेत्री ते एक क्रातीकारी नेत्या. एक असं नाव जे तुम्हाला माहिती आहे. एक अशी कथा जी तुम्हाला माहिती नाही', अशा ओळी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात.

विजय यांचे दिग्दर्शन असलेला या बायोपिकची निर्मिती विष्णू इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी केली आहे. २६ जुन २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.