मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तब्बू वयाच्या ४७ व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ पाडते. सोशल मीडियावर तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या ती अशीच एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.
तब्बूचा काही दिवसांपूर्वीच 'दे दे प्यार दे' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले आहे. अलीकडेच तिने 'आय दिवा' या डिजिटल मॅगझीनसाठी एक फोटोशूट केले आहे. मॅगझीनच्या कव्हर पेजवर तिचा फोटो पाहायला मिळतो.
- View this post on Instagram
@idivaofficial @rahuljhangiani @missmuttoo @divyakdsouza @mehakoberoi @alpaturakhia
">
या फोटोशूटमध्ये तब्बू प्रचंड आकर्षक आणि बोल्ड दिसत आहे. यामध्ये ती मल्टीकलर सॅटीनच्या ड्रेसमध्ये ती दिसत आहे. हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर प्रशांत वर्मा यांनी डिझाईन केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तब्बूने या फोटोशूटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवरही चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">