नवी दिल्ली - अयोध्यामधील बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणी तब्बल 28 वर्षांनंतर न्यायालयाने आज आपला निर्णय जाहीर केला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. ठोस पुरवे नसल्यामुळे या खटल्यातील 32 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. यानंतर बॉलिवूड कलाकारांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
-
बाबरी मस्जिद ख़ुद ही गिर गया था। 🙏🏽🙏🏽🙏🏽
— Swara Bhasker (@ReallySwara) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बाबरी मस्जिद ख़ुद ही गिर गया था। 🙏🏽🙏🏽🙏🏽
— Swara Bhasker (@ReallySwara) September 30, 2020बाबरी मस्जिद ख़ुद ही गिर गया था। 🙏🏽🙏🏽🙏🏽
— Swara Bhasker (@ReallySwara) September 30, 2020
अभिनेत्री स्वरा भास्करने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन दिली आहे. स्वराने लिहिले आहे, ''बाबरी मशिद स्वतःच कोसळली होती.'' तर रिचा चढ्ढाने लिहिलंय, ''या जागेहून वरतीही एक न्यायालय आहे. जिथे देर है अंधेर नहीं.'' कलाकारांच्या या प्रतिक्रियावर अनेक लोक कॉमेंट्स करीत आहेत.
-
इस जगह से ऊपर भी एक अदालत है, यहां देर है अंधेर नहीं।
— TheRichaChadha (@RichaChadha) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">इस जगह से ऊपर भी एक अदालत है, यहां देर है अंधेर नहीं।
— TheRichaChadha (@RichaChadha) September 30, 2020इस जगह से ऊपर भी एक अदालत है, यहां देर है अंधेर नहीं।
— TheRichaChadha (@RichaChadha) September 30, 2020
आज सकाळी साडेदहा वाजता सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी आपला निर्णय जाहीर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसराला सॅनिटाईझ करण्यात आले होते. तसेच, आरोपींना न्यायालयात आणताना फिजिकल आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर अधिवक्ता, सीबीआय काऊंसिल आणि खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही याठिकाणी प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती.बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी जवळपास 49 जणांवर आरोप होते. मात्र, त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गिरिराज किशोर, विष्णूहरी डालमिया यांचा समावेश आहे. अयोध्येतील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992ला कारसेवकांकडून पाडण्यात आली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे राम मंदिर अभियानाचे प्रमुख नेते होते.
या खटल्यामध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघ्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दूबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर आरोपी होते.