ETV Bharat / sitara

'स्त्री' चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी, राजकुमार-श्रद्धाच झळकणार मुख्य भूमिकेत - stree

पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलच्या कथेवर काम सुरू आहे. 'स्त्री'च्या सिक्वेलसाठी नवीन कल्पनांची आखणी करण्यात येणार आहे.

'स्त्री' चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी, राजकुमार-श्रद्धाच झळकणार मुख्य भूमिकेत
author img

By

Published : May 5, 2019, 1:24 PM IST

मुंबई - राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. अल्प बजेट असलेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे १०० कोटींच्या पुढे गेले होते. राजकुमार रावच्या चित्रपट करिअरमधला हा सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हॉरर कॉमेडी असलेला 'स्त्री' चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला होता. अमर कौशिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर, दिनेश विजान यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकारही झळकले होते.

Stree-2 headed up, it will go on floors next year
'स्त्री' चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी, राजकुमार-श्रद्धाच झळकणार मुख्य भूमिकेत

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'स्त्री' च्या सिक्वेलमध्येही हेच कलाकार झळकणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलच्या कथेवर काम सुरू आहे. 'स्त्री'च्या सिक्वेलसाठी नवीन कल्पनांची आखणी करण्यात येणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर सिक्वेलसाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलमधून प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, निर्मात्यांनी सांगितले आहे.

'स्त्री' चित्रपट जिथे संपतो, तिथुनच सिक्वेलची सुरुवात होणार आहे. या सिक्वेलचे बरेचसे भाग लिहून झाले आहेत. अनेक घटनांचा संदर्भ दुसऱ्या भागात दाखवला जाणार आहे. त्यामुळे 'स्त्री'चा सिक्वेलही प्रेक्षकांना नक्की आवडेल, असे दिनेश विजान यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

ent 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.