ETV Bharat / sitara

शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच करणार चित्रपटाची घोषणा - zero

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये शाहरुखने अलिकडेच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने आगामी चित्रपटाची घोषणा कधी करणार ते सांगितले.

शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच करणार चित्रपटाची घोषणा
author img

By

Published : Oct 4, 2019, 10:30 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे. त्याच्या 'झिरो' चित्रपटाच्या अपयशानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. आगामी चित्रपटाची घोषणाही त्याने केली नाही. त्यामुळे शाहरुखला पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. मात्र, आता शाहरुख त्याच्या चाहत्यांना लवकरच सरप्राईझ देणार आहे. लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे.

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये शाहरुखने अलिकडेच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने आगामी चित्रपटाची घोषणा कधी करणार ते सांगितले.

हेही वाचा- इतकी सुंदर होती कंगनाची बहिण, अ‌ॅसिड हल्ल्यानंतर बदललं रुप

शाहरुख सध्या दोन-तीन चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. या स्क्रिप्टपैकी त्याला जी स्क्रिप्ट आवडेल, त्यासाठी तो होकार देणार आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यामध्ये मी माझ्या आगामी चित्रपटाची घोषणा नक्की करेल, असे शाहरुखने यावेळी म्हटले.

शाहरुख मोठ्या पडद्यापासून जरी लांब असला, तरी त्याने डिजीटल प्लॅटफॉर्मकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्या प्रोडक्शन अंतर्गत तयार होणारी सीरीज 'बार्ड ऑफ ब्लड'चा प्रीमिअर काहीच दिवसांपूर्वी पार पडला. या वेबसीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे.

हेही वाचा -'वॉर' पाहायला जाताय, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.