मुंबई - बॉलिवूडच्या स्टारकिड्सपैकी शाहरुख खानचा मुलगा अबराम हा देखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आपल्या क्युटनेसने तो चाहत्यांची मने जिंकतो. अलिकडेच त्याच्या शाळेत धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अबरामने कांस्य आणि रौप्य पदक मिळवले आहे.
शाहरुखने अबरामसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 'माझ्या छोट्या 'गोल्ड मेडल'ने आज धावण्याच्या शर्यतीत रौप्य आणि कांस्य पदक मिळवले आहे', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.
- View this post on Instagram
Day at the Races...My little ‘Gold Medal’ with his Silver and Bronze wins at the races today!!
">
हेही वाचा -'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक
शाहरुखच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देऊन अबरामला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख सध्या चित्रपटांपासून जरी लांब असला तरीही सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तो आपले अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतो.
'झिरो' चित्रपटानंतर शाहरुखने कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नाही. त्यामुळे त्याला पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. असे असले, तरी त्याच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' अंतर्गत मात्र तो चांगला व्यवसाय करत आहे. आता यंदा तरी तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -सारा-कार्तिकच्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित, चाहते मात्र संभ्रमात