ETV Bharat / sitara

'दुवा मे याद रखना', चाहत्याच्या प्रश्नावर 'किंग खान'ने का दिलं असं उत्तर? - Shaharukh Khan on social media

शाहरुखचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर शाहरुखने आपल्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही.

SRK Answer in #AskSRK session, SRK Answer on his Flop films, srk latest news, shaharukh khan news, Shaharukh Khan on social media, AskSRK session
'दुवां मे याद रखना', चाहत्याच्या प्रश्नावर 'किंग खान'ने का दिलं असं उत्तर?
author img

By

Published : Jan 23, 2020, 2:55 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'किंग', 'बादशाह' या नावाने ओळखला जाणारा शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे. मोठ्या पडद्यावर जरी तो दिसत नसला, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. अलिकडेच त्याने #AskSRK या टॅगद्वारे चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. यापैकी काही चाहत्यांच्या प्रश्नांवर शाहरुखने दिलेल्या उत्तरांमुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

शाहरुखचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर शाहरुखने आपल्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. त्यामुळे #AskSRK च्या माध्यमातून एका युजरने शाहरुखला नेमका यासंबधीच प्रश्न विचारला.

'तुझे सर्व चित्रपट फ्लॉप होत आहेत. याबद्दल तुला काय वाटतं?', असा हा प्रश्न होता. यावर शाहरुखने 'बस आप दुवा मे याद रखना', असे उत्तर देत चाहत्यांची मने जिंकली.

आणखी एका युजरने शाहरुखला त्याच्या 'मन्नत' बंगल्यातील एका रुमचे भाडे विचारले. यावर त्याने 'त्यासाठी ३० वर्षांची मेहनत घ्यावी लागेल', असे उत्तर दिले.

चाहत्यांसोबतच अभिनेता रितेश देशमुख यानेही शाहरुखला अबराम संबधी प्रश्न विचारला. 'असा कोणता धडा आहे, जो तू अबरामकडून शिकला आहे'. या प्रश्नाचे उत्तरही शाहरुखने दिले. 'जेव्हा तुम्ही दु:खी, भुकेले आणि रागावलेले असता, तेव्हा आपला आवडता व्हिडिओ गेम खेळताना फक्त रडायचं'. यावर रितेशनेही प्रतिक्रिया देत 'मी देखील पुढच्या वेळी असेच करेन', असं म्हटलं.

Intro:Body:

SRK Answer in #AskSRK session on his Flop films

SRK Answer in #AskSRK session, SRK Answer on his Flop films, srk latest news, shaharukh khan news, Shaharukh Khan on social media, AskSRK session 

9146547649

'दुवां मे याद रखना', चाहत्याच्या प्रश्नावर 'किंग खान'ने का दिलं असं उत्तर?

मुंबई - बॉलिवूडचा 'किंग', 'बादशाह' या नावाने ओळखला जाणारा शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे. मोठ्या पडद्यावर जरी तो दिसत नसला, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. अलिकडेच त्याने #AskSRK या टॅगद्वारे चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. यापैकी काही चाहत्यांच्या प्रश्नांवर शाहरुखने दिलेल्या उत्तरांमुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

शाहरुखचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर बऱ्याच संमीश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर शाहरुखने आपल्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. त्यामुळे #AskSRK च्या माध्यमातून एका युजरने शाहरुखला नेमका यासंबधीच प्रश्न विचारला. 

'तुझे सर्व चित्रपट फ्लॉप होत आहेत. याबद्दल तुला काय वाटतं?', असा हा प्रश्न होता. यावर शाहरुखने 'बस आप दुवा मे याद रखना', असे उत्तर देत चाहत्यांची मने जिंकली. 

आणखी एका युजरने शाहरुखला त्याच्या 'मन्नत' बंगल्यातील एका रुमचे भाडे विचारले. यावर त्याने 'त्यासाठी ३० वर्षांची मेहनत घ्यावी लागेल', असे उत्तर दिले. 

चाहत्यांसोबतच अभिनेता रितेश देशमुख यानेही शाहरुखला अबराम संबधी प्रश्न विचारला. 'असा कोणता धडा आहे, जो तू अबराम कडून शिकला आहे'. या प्रश्नाचे उत्तरही शाहरुखने दिले. 'जेव्हा तुम्ही दु:खी, भुकेले आणि रागावलेले असता, तेव्हा आपला आवडता व्हिडिओ गेम खेळताना फक्त रडायचं'. यावर रितेशनेही प्रतिक्रिया देत 'मी देखील पुढच्या वेळी असेच करेल', असं म्हटलं. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.