ETV Bharat / sitara

पाहा, 'जिंदगानी' सिनेमासाठी अजय गोगावलेने गायलेले ‘सुटले धागे..’ गीत - जिंदगानी

अजय अतुल या संगीतद्वयीमधील अजय गोगावले हा अप्रतिम गायक आहे हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलं आहे. आता पुन्हा एकदा अजय 'सुटले धागे' हे नवीन गाणं आणलं असून तेही संगीतप्रेमींना भावेल हे नक्की.

अजय गोगावलेने गायलेले ‘सुटले धागे..’ गीत

author img

By

Published : Feb 5, 2022, 10:03 AM IST

भारतीयांच्या जीवनात संगीत हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आपल्याकडे सर्व प्रकारच्या संगीताला थारा मिळत असतो. मराठी चित्रपटाचं गीत संगीत हे नेहमीच प्रेक्षकांना भावलं असून आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात गीतांना असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. अजय अतुल या संगीतद्वयीमधील अजय गोगावले हा अप्रतिम गायक आहे हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलं आहे. आता पुन्हा एकदा अजय 'सुटले धागे' हे नवीन गाणं आणलं असून तेही संगीतप्रेमींना भावेल हे नक्की.

'जिंदगानी' या आगामी सामाजिक विषयावर केंद्रित असलेल्या चित्रपटाचं 'सुटले धागे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. सुटले धागे या गाण्यातून जिंदगानी चित्रपटातील सदा' या मुख्य पात्राच दुःख रेखाटलं आहे. हे गाणं प्रशांत मडपूवार याने लिहिलं असून विजय गवांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. सुटले धागे हे गाणं या चित्रपटातील सदाचे दुःख चित्रित करत प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. मानवी भाव विश्वाचे चित्रण या गाण्याचे बोल मांडतात.

‘जिंदगानी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विनायक साळवे यांनी केलं असून सदाच्या भूमिकेत ते चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर शशांक शेंडे सुद्धा या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत असून त्यांच्या सोबत वैष्णवी शिंदे ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटात दिसणार आहे. सविता हांडे, सुषमा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, प्रदीप नवले, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती यांचासुद्धा चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं संकलन निलेश गावंड, संगीत विजय गवंडे यांनी केले असून चित्रपटातील गाणी प्रशांत मडपूवार याने लिहिली आहेत तर आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे आणि अमिता घुगरी यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी सजली आहेत.

‘जिंदगानी’ या चित्रपटाची निर्मिती या सुनीता शिंदे यांच्या नर्मदा सिनेव्हीजन्सची आहे.

हेही वाचा - Ritesh Genelia Film : रितेश जेनेलिया प्रेग्नंट !! 'मिस्टर ममी'चे पोस्टर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.