ETV Bharat / sitara

आई होणाऱ्या सोनम कपूरने शेअर केले बेबी बंप फोटो

सोमवारी सकाळी सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ती आई होत असल्याची बातमी दिली. सोनमला तिचा बिझनेसमन पती आनंद आहुजासोबत पहिल्या अपत्याची प्रतीक्षा आहे. या दोघांनी 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

author img

By

Published : Mar 21, 2022, 1:29 PM IST

सोनम कपूर
सोनम कपूर

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला तिचा बिझनेसमन पती आनंद आहुजासोबत पहिल्या अपत्याची अपेक्षा आहे. सोनमने तिच्या चाहत्यांसह आणि फॉलोअर्सना सोशल मीडियावरुन गोड बातमी शेअर केली आहे. सोनम आणि आनंदने 2018 मध्ये पारंपारिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते.

सोमवारी सकाळी सोनमने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. सोनमने फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आहे ज्यात ती आनंदच्या मांडीवर डोके ठेवून तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

सोनमने सोशल मीडियावर गरोदरपणाची बातमी शेअर केल्यानंतर लगेचच तिच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदन संदेशांचा वर्षाव सुरू झाला. सोनमच्या चुलत बहिणी जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि अंशुला कपूर या तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या कुटुंबातील पहिल्या होत्या.

सोनमने 8 मे 2018 रोजी मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले. या जोडप्याने नंतर फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते.

हेही वाचा - बर्थडे स्पेशल: ब्युटी ट्रेंड सेट करणारी सदाबाहार राणी मुखर्जी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.