मुंबई - अभिनेत्री सोनाली बेंद्रेला गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्या हायग्रेड कॅन्सरचे वृत्त कळताच कलाविश्वात खळबळ उडाली होती. मात्र, सोनाली या कठीन प्रसंगाला मोठ्या हिमतीने सामोरी गेली. तिच्यावर न्युयॉर्क येथे उपचार करण्यात आले. केमोच्या चक्रातूनही तिने धैर्याने बाहेर पडली. तिच्या या कॅन्सरप्रवासाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. उपचारादरम्यान सोनालीने चाहत्यांशी वेळोवेळी अपडेट्स शेअर केले. इतरांसाठीही ती प्रेरणादायी ठरली. तिच्या या प्रवासाने तिला आयुष्य जगण्याची नवी दृष्टी दिली. त्यामुळे या प्रवासाच्या वर्षपूर्तीनिमित्त सोनालीने भावनिक पोस्ट शेअर केलीआहे.
![Sonali share post on one year completed of fighting cancer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3750835_sonal.jpg)
इन्स्टाग्रामवर तिने तिचा एक फोटो शेअर करून तिच्या कॅन्सर प्रवासाला उजाळा दिला आहे. कॅन्सरने तिला आणखी मजबूत बनवले, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. तिचा आधीचा लूक आणि कॅन्सरनंतरचा लूक यामध्ये खूप तफावत पाहायला मिळतेय. तरीही तिने हार न मानता कॅन्सरला झुंज दिली.
'तुमच्या दु:खात तुम्ही मजबूत राहा. त्यातून बहरत जा.
तुम्ही मला यासाठी आधार दिला.
त्यामुळे मी अतिशय सुंदर पद्धतीने बहरली आहे. काहीही झाले तरीही फक्त बहरत राहा', अशा ओळी तिने या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. या ओळी रुपी कौर यांच्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या पोस्टसोबतच तिने चाहत्यांचेही आभार मानले आहेत.